धनंजय मुंडेंचं एकच ध्येय, खोटं बोल पण रेटून बोल : पंकजा मुंडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आरोपांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलंय. खोटं बोल पण रेटून बोल आणि माझ्यावर आरोप कर हे धनंजय मुंडेंचं एकमेव ध्येय आहे, असा पलटवार पंकजांनी केला. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये भाजपला मतदान न झालेल्या बूथची यादी मागवली असा आरोप करत ईव्हीएम हॅकिंगची […]

धनंजय मुंडेंचं एकच ध्येय, खोटं बोल पण रेटून बोल : पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: May 21, 2019 | 6:36 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आरोपांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलंय. खोटं बोल पण रेटून बोल आणि माझ्यावर आरोप कर हे धनंजय मुंडेंचं एकमेव ध्येय आहे, असा पलटवार पंकजांनी केला. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये भाजपला मतदान न झालेल्या बूथची यादी मागवली असा आरोप करत ईव्हीएम हॅकिंगची शंका असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले होते.

बीडमध्ये अजून तरी कोणत्याही बूथची यादी मागवलेली नाही. निकालानंतर आपल्याला कोणत्या भागात किती मतदान झालं याची माहिती प्रत्येक नेत्यालाच मिळते. शिवाय निवडणुकीत कोणत्या भागातून आपल्याला किती मतदान झालं याचा आढावा प्रत्येक जण घेतो, धनंजय मुंडेंनीही तो आढावा घेतलाच असेल. मग यात गैर काय असा सवालही पंकजा मुंडेंनी केला. ते माझे बंधू आहेत, त्यांना लहानपणापासून ओळखते, खोटं बोल पण रेटून बोल एवढंच ते करतात, असं पंकजा म्हणाल्या.

“मराठवाड्यातल्या आठही जागा जिंकू”

एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. पण महाराष्ट्रात युतीला 38-44 जागा मिळतील, असा अंदाज पंकजांनी व्यक्त केला. मराठवाड्यातील जबाबदारी पंकजा मुंडेंकडे होती. मराठवाड्यातील आठही जागांवर भाजपचा विजय होईल, असा दावा पंकजांनी केला. उस्मानाबाद, परभणी आणि बीडमध्ये आमचाच विजय होईल, असा दावा राष्ट्रवादीने केलाय. पण पंकजांनी हा दावा फेटाळून लावला.

VIDEO : पंकजा मुंडेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.