समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव, स्थगिती मिळण्याचा प्रश्नच नाही : देवेंद्र फडणवीस
राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात येत (devendra fadnavis on samruddhi project) आहे.
नांदेड : “राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात येत (devendra fadnavis on samruddhi project) आहे. मात्र मुंबई- नागपूर ‘समृद्धी द्रुतगती महामार्गाला आता स्थगिती मिळणार नाही. कारण या प्रकल्पाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प नक्कीच पूर्ण होईल,” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.
“समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात क्रॉंक्रिटीकरण करण्यापर्यंत हे काम आलं आहे. मला विश्वास आहे की या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लागले आहे. त्यामुळे हे काम थांबू शकत नाही. त्यामुळे ते इतर कोणत्याही कामाला स्थगिती देतील, मात्र समृद्धी महामार्गाला स्थगिती देतील असं वाटत नाही,” असे फडणवीस म्हणाले.
“जलयुक्त शिवारचं प्रचंड मोठं काम केलं. त्याचे परिणाम देखील अत्यंत चांगले आले. औरंगाबाद खंडपीठाच्या तज्ज्ञ समिती बसवली त्याने रिपोर्ट दिला जलयुक्त शिवारचा प्रचंड मोठा फायदा या ठिकाणी मराठवाड्याला झाला आहे. पाण्याची लेवल पुन साठवण्याचे काम जयुक्त शिवार योजनेमुळे झाले. आता काही लोक त्याला नावं ठेवतं आहे. ते बंद करण्याच्या मागेल लागेल आहेत. मला माहिती आहे काही लोकं बंद करतील मग त्यात बदल करुन नाव बदलून पुन्हा सुरु करतील,” अशी टीकाही फडणवीसांनी ठाकरे सरकारवर (devendra fadnavis on samruddhi project) केली.
“जलयुक्त शिवार ही योजना बंद होऊ शकत नाही. ही योजना सरकारची नाही. तर जनतेच्या मनातील योजना आहे आणि जनतेच्या मनातील योजना कधीच बंद होऊ शकत नाही. जनतेने लोकसहभागातून ही योजना तयार केली आहे. 7000 कोटी मध्ये 5 लाख काम झाली आहे. या सरसकट भ्रष्टाचार झालेला नाही,” असेही फडणवीस म्हणाले.
“जर कुणी चुका केल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण लोकांच्या मनातील योजना सुरु राहिली पाहिजे. मराठवाड्याच्या विकासासाठी 5 वर्षे चांगलं काम केलं. त्यामुळे या सरकारने मराठवाड्यासाठी आम्ही सुरु केलेले प्रकल्प ते पूर्ण करावे. त्याशिवाय त्यांनीही नवीन प्रकल्प सुरु करावेत. आम्ही त्याला समर्थन देऊ. त्यांना मदत करु. मागास भागाच्या कल्याणाकरिता ते जे काही प्रकल्प हाती घेतील. त्याला पूर्ण समर्थन देऊ. पण केवळ कागदावर घेऊ नका,” असेही फडणवीसांनी यावेळी (devendra fadnavis on samruddhi project) सांगितले.