खातेवाटपानंतर महाविकासआघाडीचं नाराज नेत्यांकडे लक्ष, लवकरच तिन्ही पक्षांची समन्वय समिती
तीन पक्षांचे सरकार असलेल्या महाविकासआघाडीमध्ये वेळोवेळी बंडोबांचे बंड आणि नाराजी दूर करण्यासाठी लवकरच समन्वय समिती (Maha vikas aghadi Coordination committee) बनवली जाणार आहे.
मुंबई : महाविकासआघाडीचे खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. अनेकर कुरबुरी, नाराजी, बंडखोरी असे अनेक धक्के खातेवाटप जाहीर (Maha vikas aghadi Coordination committee) झालं. मात्र तीन पक्षांचे सरकार असलेल्या महाविकासआघाडीमध्ये वेळोवेळी बंडोबांचे बंड आणि नाराजी दूर करण्यासाठी लवकरच समन्वय समिती (Maha vikas aghadi Coordination committee) बनवली जाणार आहे.
मंत्री पद मिळाले नाही म्हणून राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सोळंकेच बंड असेल किंवा राज्यमंत्री पदाऐवजी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला नाही म्हणून शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची नाराजी असेल. तर 30 तारखेपासून ते खातेवाटप जाहीर होईपर्यंत महाविकासआघाडीमधील कुरबुरी सुरु आहेत.
भविष्यात या कुरबुरी जर बंद दाराआड संपवायच्या असतील, तर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त सरकारमधील काही वरिष्ठ मंत्र्यांची समन्वय समितीची स्थापन केली जाणार आहे. त्यात पक्षाच्या पातळीवर ही जर काही अडचणी असतील, तर त्या चव्हाट्यावर येण्याआधी तिन्ही पक्षांच्या समन्वय समिती स्थापन केली जाणर आहे.
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील येणाऱ्या काळात प्रत्येक अडचणींवर मात करेल. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असा दावा केला (Maha vikas aghadi Coordination committee) आहे.
विशेष म्हणजे एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, पाच वर्षे हे सरकार अतिशय उत्तमरित्या चालेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाना सोबत घेऊन काम करतील. देशात काय परिस्थिती आहे त्यांना माहीत आहे आणि देशातील परिस्थिती पाहूनच ते राजकारण करतील.
मात्र महाविकासआघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविश्वास दाखवला आहे. हे सरकार सहा महिने देखील चालेल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रत्येक सभेदरम्यान फडणवीस सरकारवर टीकाही करत आहे.
सरकारमधील नाराजांचे नाराजीचे सूर हे पक्षामध्ये आवरण्याची खरी कसरत या सरकारच्या वरिष्ठांना करावी लागणार (Maha vikas aghadi Coordination committee) आहे.