मोठी बातमी: ठाकरे सरकारचे ‘ते’ पत्र काम साधणार; राज्यपालांना आमदारांची नियुक्ती करावी लागणारच?

| Updated on: Feb 25, 2021 | 7:43 AM

यापूर्वी ठाकरे सरकारकडून 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अनेक पत्रं पाठवली आहेत. त्यानंतर स्मरणपत्र पाठवून राज्यपालांना वेळोवेळी या गोष्टीची आठवणही करुन देण्यात आली. | governor bhagat singh koshyari

मोठी बातमी: ठाकरे सरकारचे ते पत्र काम साधणार; राज्यपालांना आमदारांची नियुक्ती करावी लागणारच?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us on

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विधानपरिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी आता ठाकरे सरकारकडून नव्या मार्गाचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari ) यांच्यावर कायदेशीर दबाव निर्माण करुन किमान काही नावांना मंजुरी मिळवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. (Thackeray govt will send letter to governor bhagat singh koshyari)

यापूर्वी ठाकरे सरकारकडून 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अनेक पत्रं पाठवली आहेत. त्यानंतर स्मरणपत्र पाठवून राज्यपालांना वेळोवेळी या गोष्टीची आठवणही करुन देण्यात आली. सुरुवातीच्या काळात राज्यपालांकडून या विलंबासाठी कोरोना परिस्थितीचे कारण पुढे केले जात होते. मात्र, आता कोरोनाची पहिली लाट ओसरुन दुसरी लाट येण्याची वेळ आली तरीही राज्यपाल कोश्यारी याबाबत कोणताही निर्णय घ्यायला तयार नाहीत.

त्यामुळे आता ठाकरे सरकारने कायदेशीर डावपेच वापरायचेच ठरवले आहे. त्यासाठी अ‍ॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्या सल्ल्याने राज्य सरकारकडून एक पत्र लिहण्यात आले आहे. हे पत्र आता राज्यपालांना पाठवले जाईल. या पत्रात कायदेशीर युक्तिवाद करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्यपाल 12 पैकी सरकारने सुचविलेल्या काही नावांना तरी मंजुरी देतील, असा कयास बांधला जात आहे.

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली

या सगळ्या वादामुळेच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने भगतसिंह कोश्यारी यांच्या विमानप्रवासाला परवानगी नाकारल्याचे समजते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. मात्र, विमानात बसल्यानंतर त्यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून खाली उतरण्याची नामुष्की ओढावली होती. यानंतर राज्यपाल खासगी कंपनीच्या विमानाने उत्तराखंडला रवाना झाले होते.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे
2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला

(List of Governor elected 12 MLC hand over to Bhagat Singh Koshyari)

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला
2) नितीन बानगुडे पाटील
3) विजय करंजकर
4) चंद्रकांत रघुवंशी

संबंधित बातम्या:

अखेर ‘ती’ यादी राज्यपालांकडे; महाविकास आघाडीचे मंत्री म्हणतात…

विधानपरिषद : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे

मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेसाठी शिफारस केलेली 12 नावे लवकर जाहीर करा, अन्यथा… : पृथ्वीराज चव्हाण

(Thackeray govt will send letter to governor bhagat singh koshyari)