निवडणूक आयोगाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील आज कोणते मुद्दे मांडणार? ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले…

केंद्रीय निवडणूक आयोगात आज ठाकरे गटाला बाजू मांडण्याची संधी मिळणार असून त्यात महत्वाचे दोन मुद्दे मांडले जाणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी म्हंटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील आज कोणते मुद्दे मांडणार? ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 1:44 PM

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा मुद्दा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणीतच अडकून पडला आहे. दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बाजू मांडली जाणार आहे. कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे वकील असून ते ठाकरे गटाकडून युक्तिवाद करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी आजच्या सुनावणीत कोणते मुद्दे मांडले जाणार असल्याचे सांगितले आहे. अनिल देसाई म्हणाले आमची तयारी पूर्ण झाली आहे. कपिल सिब्बल हे आमच्या वतीने बाजू मांडतील यावर आमचं एकच म्हणणं आहे योग्य न्याय हवा आहे. पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत नीट न्याय व्हावा. पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यावर निर्णय व्हावा असे दोन अर्ज निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय द्यावा असं अनिल देसाई म्हणाले.

याशिवाय अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मैदानावरील एका विधानाचा संदर्भही दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचाच माणूस असल्याचा किस्सा सांगितला होता.

त्यावर अनिल देसाई यांनी सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने अशा विधानांची नोंद घ्यायची असते, आणि त्यानुसार निर्णय द्यायचा असतो. पक्षातील वाद हा एक मुद्दा असू शकतो.

हे सुद्धा वाचा

मी कुणाचा माणूस आहे ? हे जार त्यांनी सांगितले आहे तर त्यांना राजकीय संदर्भ द्यायचा होता आणि ते कुणाचे होते हे समोर आले आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयात हे मुद्दे येतील असं वाटतंय असेही देसाई म्हणाले आहे.

सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयात अनेक संदर्भ असतात तसे सुमोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा संदर्भ निकालात येईल असेही अनिल देसाई यांनी म्हंटले आहे.

एकूणच आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे होणाऱ्या सुनावणीत ठाकरे गट बाजू मांडणार असून निकाल त्यांच्या बाजूने लागेल अशी त्यांना अपेक्षा असून सुनावणीत काय घडतं याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.