“हा सगळा बाजार मांडलाय” ; ठाकरे गटाच्या नेत्यानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मत व्यक्त केलं…
निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी देशात हा सगळा बाजार मांडला असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.
नवी दिल्लीः ठाकरे गटाच्या आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर दोन्ही गटातील नेत्यांनी मतं व्यक्त केली आहेत. मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांनी या सुनावणीबाबत मात्र चिंता व्यक्त करत निवडणूक आयोगावर साशंकता व्यक्त केली आहे. शिंदे गटाकडून ज्या प्रकारे राजकारण केले आहे, त्याबाबत निर्णय देताना कोणीही सामान्य माणूस जर संविधानाचा विचार करेल आणि योग्य तो निर्णय देईल असा टोला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी लोकशाहीबद्दलही चिंता व्यक्त केली.
आज न्यायालयामध्ये आमची सुनावणी तरी झाली आहे, मात्र या निर्णयाबाबत सातत्याने विलंब का होतो आहे त्याचाही विचार करणे गरजे असल्याचे मत अरविंद व्यक्त केले आहे.
ठाकरे गटाबाबत ही सुनावण झाली असली तरी हा घटनाक्रम संविधानाच्या आखरित्या राहून तापसणार की नाही असा सवालही अरविंद सावंत यांनी केला आहे.
सध्याच्या न्यायालयाच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, संविधानाला जर बायपास करूनच तु्म्ही जर निर्णय घेणार असाल तर मग लोकशाहीबाबत अवघड आहे अशी चिंताही अरविंद सावंत यानी व्यक्त केली आहे.
सध्याच्या घडीला आणि शिवसेना पक्षाबाबत जो निर्णय देण्तात येत आहे तो अगदी घाऊक बाजारातील परिस्थितीसारखाच आहे असा टोला त्यांनी निवडणूक आयोगाल लगावला आहे. या पद्धतीच्या निर्णयामुळे संविधानाची बूज राखली जात नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीच्या आयोगाच्या या अशा निर्णयामुळे लोकशाहीची बूज राखली जात नाही. या प्रकरणामुळेच ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लोकशाहीबाबत चिंता व्यक्त केले आहे.
यावेळी अरविंद सावंत यांनी आजच्या सुनावणीबाबत मत व्यक्त करताना ते म्हणाले की, आजच्या सुनावणीत आम्हाला न्याय मिळायला हवा होता मात्र निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागले आहे त्यावरून ते विकले गेले आहे असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी देशात हा सगळा बाजार मांडला असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.
तुम्ही आमच्यासारखा निर्णय द्या आम्ही तुम्हीला राज्यपाल करतो अशीच रणनीती सध्या वापरली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. हा निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.