पक्षाच्या नावासाठी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ‘हे’ 3 पर्याय सादर?

सूत्रांकड़ून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ठाकरे गटाकडून पक्षाच्या नावासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय सादर करण्यात आले आहेत.

पक्षाच्या नावासाठी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे 'हे' 3 पर्याय सादर?
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 2:30 PM

मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाहीये. सोबतच शिवसेना (Shiv sena) या नावाचा देखील वापर करता येणार नाहीये. हे आदेश निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत लागू असणार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सूत्रांकड़ून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ठाकरे गटाकडून पक्षाच्या नावासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय सादर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये  शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांचा समावेश आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे पक्षाच्या नावासाठी ठाकरेंच्या तीन पिढ्यांची नावं आयोगाकडे सादर  करण्यात आली आहेत.

चिन्हासाठी तीन पर्याय

दरम्यान नावाप्रमाणेच उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हाच्या निवडीसाठी देखील तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहेत. त्यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन पर्यायांचा समावेश आहे. यापैकी एक चिन्ह मिळावे अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

या तीन चिन्हांपैकी उगवता सूर्य आणि मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत. ही दोन चिन्हे देशात आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने आपले पक्ष चिन्ह म्हणून घेतले नाही. त्यामुळे त्यापैकी एक चिन्ह आमच्या गटाला मिळावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. पक्षाची विचारसरणी, भूमिका आणि राजकीय वाटचालीशी मेळ साधणारे चिन्ह गटाला मिळावे यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.