है तैयार हम… लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची 10 जणांची टीम; कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी

पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जोर बैठका सुरू आहेत. मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. उमेदवारांची चाचपणीही केली जात आहे. जिथे काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यावर भर दिला जात आहे. कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची नाराजीही दूर केली जात आहे. तर पक्षातील भरवश्याच्या नेत्यांवर जबाबदारीही दिली जात आहे.

है तैयार हम... लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची 10 जणांची टीम; कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी
uddhav thackerayImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 7:15 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : महायुतीशी दोन हात करण्यासाठी ठाकरे गट सरसावला आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने दहा जणांची टीम तयार केली आहे. या टीममध्ये नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यावर विभागानुसार जबाबदारी देण्यात आली आहे. या दहाही नेत्यांना दिलेले मतदारसंघ बांधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती जिंकून दाखवायचंच असा चंगच ठाकरे गटाने बांधला आहे.

आगामी निवडणुकांची तयारी आणि महाराष्ट्रासह दिल्लीत ‘बदल’ घडविण्याची तयारी म्हणून जानेवारीत राज्यव्यापी शिबीर, जाहीर सभा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती दौऱ्यांचे नियोजनही करण्यात आले आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे.

नेत्यांवर जबाबदारी

उद्धव ठाकरे यांनी ‘नेते’ मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढवली आहे. आता नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी 10 नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर उत्तर महाराष्ट्रासह, नगर, शिर्डी, पुणे, मावळची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अरविंद सावंत पश्चिम विदर्भ, भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल देसाई पश्चिम महाराष्ट्र, राजन विचारे ठाणे-पालघर, चंद्रकांत खैरे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांच्याकडे मराठवाडा तर अनंत गीते, विनायक राऊत यांच्याकडे कोकणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दौरे सुरू होणार

जबाबदारी देण्यात आलेल्या नेत्यांना त्या त्या भागात जाऊन लोकसभा मतदारसंघ बांधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ती जागा कशी निवडून येईल यावर भर देण्यासही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता या नेत्यांचे दौरेही सुरू होणार आहेत.

कुणावर कोणती जबाबदारी

संजय राऊत : नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे शिरूर, बारामती, मावळ

अनंत गीते : लोकसभा मतदारसंघ रायगड, मावळ ( विधानसभा – पनवेल, कर्जत, उरण )

आमदार भास्कर जाधव : पूर्व विदर्भ, लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर

खासदार विनायक राऊत : कोकण ( रत्नागिरी, सिंधुदुर्ग ), लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी, सिंधुदुर्ग

खासदार राजन विचारे : कोकण ( ठाणे, पालघर ), लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर

आमदार रवींद्र वायकर : मराठवाडा, लोकसभा मतदारसंघ नांदेड, हिंगोली, परभणी

चंद्रकांत खैरे : मराठवाडा, लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना

खासदार अरविंद सावंत : पश्चिम विदर्भ, लोकसभा मतदारसंघ बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ – वाशिम, वर्धा

खासदार अनिल देसाई : पश्चिम महाराष्ट्र, लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी

सुनील प्रभू : सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.