Nilesh Rane on Uddhav Thackeray | ठाकरेंचे दिवस फिरले, नीलेश राणेंनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना डिवचलं

राज्यसभेत शिवसेनेचा उमेदवार निवडून आणता आला नाही. दुसरीकडं चंद्रकांत हांडोरे यांचा महाविकास आघाडी एकत्र असताना पराभव झाला. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करण्याच्या तयारीत दिसतात. एकंदरीत ठाकरे यांचे दिवस फिरले आहेत, असं ट्विट नीलेश राणे यांनी केलंय.

Nilesh Rane on Uddhav Thackeray | ठाकरेंचे दिवस फिरले, नीलेश राणेंनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना डिवचलं
नीलेश राणे
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 12:44 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भाजपनं धक्का दिला. त्यानंतर आता विधान परिषद निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीतही महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पुन्हा धक्का बसला. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार निवडून आले. शिवसेनेचे सचिन अहीर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे विजयी झाले. परंतु, काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला. आघाडीची सुमारे 20 मतं खेचण्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यश आलं. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. यामुळे ठाकरे दिवस फिरले अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी ट्विटवरून दिली.

नीलेश राणेंचे ट्वीट

एकनाथ शिंदे बंडाच्या तयारीत

नीलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र आहेत. राणे पिता-पुत्र हे ठाकरे घराण्याच्या विरोधात नेहमी बोलत असतात. आतापर्यंत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. परंतु, आता त्यांचे दिवस फिरले आहेत. कारण त्यांचे जवळचे सहकारी एकनाथ शिंदे हे 33 आमदारांना घेऊन गुजरातला रवाना झालेत. सूरतमध्ये भाजपच्या नेत्यांनी त्यांची व्यवस्था केली. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाऊ शकतात. एकीकडं राज्यसभेत शिवसेनेचा उमेदवार निवडून आणता आला नाही. दुसरीकडं चंद्रकांत हांडोरे यांचा महाविकास आघाडी एकत्र असताना पराभव झाला. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करण्याच्या तयारीत दिसतात. एकंदरीत ठाकरे यांचे दिवस फिरले आहेत, असं ट्विट नीलेश राणे यांनी केलंय.

अद्याप चित्र स्पष्ट नाही

या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. ते शिवसेना सोडणार नाहीत. याशिवाय त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांशी संपर्क सुरू आहे. त्यांनी असं सांगितलं की, ते लवकरच परत येतील. गुजरातमध्ये या आमदारांची घेराबंदी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी केलेलं ट्वीट हे चर्चेत आलं आहे. खरोखरच ठाकरेंचे दिवस फिरले काय ते येणारा काळाच ठरवेल. कारण अद्याप कोणत्याही प्रकारचे चित्र स्पष्ट झालेलं नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.