Anil Desai : ठाकरेंची ओळख अन् कर्तुत्व जगाला माहितीयं, सावंत आपलं अस्तित्व काय? अनिल देसाईंचा सवाल..!
सध्या केंद्रीय संस्थांचा कसाही वापर केला जात असला तरी आपला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. संजय राऊतांवर कशा प्रकारे आणि का कारवाई झाली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. केवळ राज्यपालांचे वक्तव्य बाजूला पडावे आणि नवी चर्चा निर्माण व्हावी म्हणून संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत राज्यसभा अध्यक्षांना नोटिस दिली असून कारवाईबाबत चर्चा करण्याची मागणी केल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.
मुंबई : ठाकरे यांची ओळख नावाने तर आहेच पण गेल्या काही वर्षापासून त्यांच्या कर्तुत्वाने जगाला वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. आता बंडखोर आमदार हे आपले पाप लपवून ठेवण्यासाठी अशी टिका करीत आहेत. (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांचा झंजावत दौरा सबंध महाराष्ट्र पाहत आहेत. त्यामुळे त्यांना ओळख करुन द्यायची गरज नाही पण आपले अस्तित्व काय आहे? याचा जरा विचार (Tanaji Sawant) तानाजी सावंत यांनी करावा असा टोला (Shiv sena) शिवसेनेचे अनिल देसाई यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरेंच काम फक्त मुंबईनं नाही तर जगानं पाहिलंय असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टिका केली आहे. तर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातु असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
तरीही सर्वोच्च न्यायालयावर विश्वास..!
सध्या केंद्रीय संस्थांचा कसाही वापर केला जात असला तरी आपला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. संजय राऊतांवर कशा प्रकारे आणि का कारवाई झाली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. केवळ राज्यपालांचे वक्तव्य बाजूला पडावे आणि नवी चर्चा निर्माण व्हावी म्हणून संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत राज्यसभा अध्यक्षांना नोटिस दिली असून कारवाईबाबत चर्चा करण्याची मागणी केल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. राऊतांवरील कारवाईने शिवसनेचा आवाज दबणार नाहीतर तो अधिक प्रखरपणे बाहेर येईल असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यावरही टीकास्त्र
मी मुलाखत दिली तर भूकंप होईल असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. याचाही खरपूस समाचार देसाई यांनी घेतला आहे. आपण कुणामुळे आहोत..? कुठे आहोत आणि का आहोत.? याचे परिक्षण करुन बोलणे महत्वाचे आहे. पण काहींना याचा विसर पडला आहे. जनता विसरणार नाही आणि शिवसेनेची वाटचालही कोणी रोखू शकणार नाही. मातोश्री ने आतापर्यंत सर्वांना सांभाळून घेतले आहे. त्याचा विसर म्हणजे दुर्देव असल्याचेही देसाई यांनी सांगितले आहे.
सावंतावर जहरी टिका
आ. तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर एकेरी टिका केली होती. कोण आदित्य ठाकरे..? तो एक आमदार आहे असे त्यांनी म्हटले होते. आता शिवसैनिकांकडून त्या विधनाचा समाचार घेतला जात आहे. आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांची ओळख आणि कर्तुत्व हे जगाला माहिती आहे. त्यामुळे आपले अस्तित्व काय हे आगोदर सावंतांनी पाहावे असा टोला देसाई यांनी लगावला आहे.