एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ठाण्यात बॅनरबाजी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत अशी बॅनरबाजी ठाण्यात करण्यात आली (Thane eknath shinde cm poster)  आहे. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ठाण्यात बॅनरबाजी
Follow us
| Updated on: Nov 03, 2019 | 7:09 PM

ठाणे : भाजप-शिवसेनेची सत्तावाटपावरुन (BJP Shivsena Government Formation Dispute) रस्सीखेच सुरूच आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील 50-50 च्या वाट्यावर अडून बसली आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे मुख्यमंत्री म्हणून पोस्टरबाजी सुरु (Thane eknath shinde cm poster)  आहे. यानंतर आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत अशी बॅनरबाजी ठाण्यात करण्यात आली (Thane eknath shinde cm poster) आहे.

ठाण्यातील कोलबाड परिसरात एकनाथ शिंदे यांच्या नावे ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. आमच्या ठाण्याचे लाडके ढाण्यावाघ एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत हिच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे. यावर मराठी वाहतूक व्यापारी सेना संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी ठाण्यात हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचाही फोटो पाहायला मिळत आहे. ठाण्यातील या पोस्टरबाजीमुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली (Thane eknath shinde cm poster)  आहे.

विधानसभा निवडणुकीतनंतर युतीने बहुमताचं सरकार स्थापन करणे अपेक्षित होते, मात्र तसं न होता युतीतच फूट पडल्याचं चित्र दिसत आहे. जवळपास 11 दिवस उलटले तरी भाजप -शिवसेनेची सत्तेच्या वाटाघाटी सुरु आहेत.

युतीत पेच कायम

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय वातावरण तापलेलं (BJP-Shivsena Alliance) आहे. निवडणुकांनंतर युतीने बहुमताचं सरकार स्थापन करणे अपेक्षित होते, मात्र तसं न होता आता युतीतच फूट पडल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या ठरलेल्या 50-50 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागितलं आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाही फॉर्म्युला ठरलं नसल्याचं सांगितल आहे. त्यामुळे युतीमध्ये तेढ निर्माण झाली आहे.

आता शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी भाजपवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शिवसेनेने विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठीही सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे, तर भाजप मात्र या विषयावर उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात नेमकं कुणाचं सरकार स्थापन होणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, शपथविधी शिवतीर्थावर : संजय राऊत

सामनातून संजय राऊतांनी सुचवलेले सत्तास्थापनेचे पाच पर्याय

ईडीची भीती बंद, आता राष्ट्रपतींची धमकी सुरु, पण राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत : संजय राऊत

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.