उद्धव ठाकरेंचं ठाण्यात जंगी स्वागत, ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray at Thane Municipal corporation) यांनी आज ठाण्यात जाऊन नगरसेवक आणि नवनिर्वाचित महापौरांची भेट घेतली.
ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray at Thane Municipal corporation) यांनी आज ठाण्यात जाऊन नगरसेवक आणि नवनिर्वाचित महापौरांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray at Thane Municipal corporation) यांचं शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. ठाणे महापालिका सभागृहात बिनविरोध म्हणून सेनेचा महापौर नरेश म्हस्के आणि उपमहापौर पदी पल्लवी कदम यांची निवड झाली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक यांचे आभार मानले. मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर दुसरीकडे शिवसेना हा आदेशाने चालणारा पक्ष आहे, शिवसेनेला जाणीव आहे संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या दिल्या तरी कोणीही आमदार फुटणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
आज महापौर आणि उपमहापौरपदासाठी सभागृहात एकमताने मंजुरी दिली. त्यासाठी सेना नेते एकनाथ शिंदे यांनी सभागृहात येऊन नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांचा सत्कार केला. ठाणे महापालिका सभागृहात बिनविरोध म्हणून सेनेचा महापौर नरेश म्हस्के आणि उपमहापौर पदी पल्लवी कदम हे सभागृहात विराजमान झाले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीची माघार
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विनंतीवरुन राष्ट्रवादीने ठाणे महापालिका महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. (Thane Municipal Corporation Mayor Elections). त्यामुळे ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच असेल हे सिद्ध झालं होतं.
ठाणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी (16 नोव्हेंबर) अर्ज दखल करण्यात आले होते .(Thane Municipal Corporation Elections). महापौर पदासाठी ठाणे महापालिकेचे सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी कदम (Pallavi Kadam) यांनी अर्ज दाखल केला होता. महापौर आणि उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकही अर्ज दाखल करणार होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे नरेश म्हस्के यांची महापौरपदी तर पल्लवी कदम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.
संबंधित बातम्या
एकनाथ शिंदेंच्या विनंतीवरून महापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार