ठाणे : ठाणे महापालिका (TMC election 2022) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी ही पालिका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील याच जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात. दुसरीकडे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मागील वेळी चार सदस्यीय प्रभागरचना आता तीन सदस्यीय झाली आहे. 2017ला एकूण 131 जागांपैकी तब्बल 67 जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. यंदा तीन सदस्यीय प्रभागरचना आहे. आरक्षणही बदलले आहे. 47 प्रभागांमधील 142 जागांसाठी लढत होणार आहे. प्रभाग 24मध्ये 50-50 असे विजय पाहायला मिळाले. चार जागांमध्ये दोन जागा राष्ट्रवादीला तर दोन जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. यावेळी कोण बाजी मारणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेला बंडखोरीने ग्रासले असून हे नगरसेवक शिवसेनेतून निवडून येतात, की शिंदे गटाला पाठिंबा देतात, हेदेखील पाहावे लागणार आहे.
प्रभाग 24 श्री नगर, शांती नगर, राम नगर यात प्रामुख्याने वाल्मिकी मंदीर, मुकेश प्रल्हाद धिंग्रा हाऊस, बारी मेटल फिनिशर्स, राव इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, आरबीआय निशिगंधा सोसायटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी परिसर येतात.
प्रभाग 24मधील एकूण लोकसंख्या 38,833 असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 3657 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1702 इतकी आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांची संमिश्र ताकद असलेला हा प्रभाग आहे. यावेळी शिवसेनेतील मोठा गट फुटला असून दोन भाग झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला याचा फटका बसणार, की राष्ट्रवादी मुसंडी मारणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
गायकवाड आरती वामन – राष्ट्रवादी
पाटील प्रियांका अविनाश – शिवसेना
जितेंद्र बाळाराम पाटील – राष्ट्रवादी
पूजा संदीप करसुळे (गवारी) – शिवसेना
प्रभाग 24 (A)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग 24 (B)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग 24 (C)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग 24मध्ये मागील वेळेप्रमाणे आरक्षण नसून त्यात बदल झाला आहे. त्यानुसार 24 अ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी तर क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.