शिवसेनेचे दोन बडे नेते काँग्रेसमध्ये, अशोक शिंदेंसह बाळ्या मामा म्हात्रेंचेही पक्षांतर

शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आहेत.

शिवसेनेचे दोन बडे नेते काँग्रेसमध्ये, अशोक शिंदेंसह बाळ्या मामा म्हात्रेंचेही पक्षांतर
(डावीकडे) अशोक शिंदे आणि सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 11:08 AM

ठाणे : एकीकडे प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असतानाच शिवसेनेला काँग्रेसने एकामागून एक असे दोन धक्के दिले आहेत. ठाण्यातील शिवसेना नेते सुरेश (बाळा मामा) म्हात्रे (Suresh Balya Mama Mhatre) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत म्हात्रे मुंबईत काँग्रेसचा झेंडा हाती धरतील. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना त्यानंतर आता काँग्रेस असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे.

शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये लढत असताना भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध केल्याने त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले होते. नंतर निलंबन मागे घेण्यात आले होते.

कोण आहेत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा?

सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे बाळ्या मामा नावाने प्रसिद्ध शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते, तर बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती 2014 मध्ये म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती पराभवानंतर आधी भाजप, नंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला होता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेत कपिल पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेतून निलंबित करण्यात आले, नंतर निलंबन मागे घेण्यात आले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्यापासून नाना पटोले (Nana Patole) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत.

शिवसेना उपनेते अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये

दुसरीकडे, शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे (Anant Gudhe) आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.

संबंधित बातम्या:

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ

प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती; समितीत देसाई, पटोले आणि पाटील

शिवसेनेला धक्का, माजी राज्यमंत्री शिवबंधन सोडून पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये

(Thane Shivsena Leader Suresh Balya Mama Mhatre to join Congress in presence of Nana Patole)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.