…म्हणून रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्या उमा खापरेंचा मोठा गौप्यस्फोट

धनंजय मुंडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच रेणू यांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षआ उमा खापरे यांनी केला आहे.

...म्हणून रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्या उमा खापरेंचा मोठा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 8:30 AM

मुंबई :  राष्ट्रवादीचे बडे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. तक्रार मागे घेतल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. रेणू शर्मांनी तक्रार मागे घेतल्याने विविध तर्क-वितर्क लढवले जातायत. अशातच धनंजय मुंडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच त्यांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षआ उमा खापरे यांनी केला आहे. (Thats why Renu sharma withdrawal rape Complaint Against NCP Dhananjay Munde Says BJP Uma Khapre)

धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. गायक रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधात शारिरिक छळाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. खुद्द सामाजिक न्यायमंत्र्यांवरच बलात्काराचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात हादरा बसला होता. मात्र आज सकाळी (शुक्रवार) रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण ही तक्रार मागे घेतोय, असं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

कौटुंबिक वादातून मी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. परंतु आता मी ही तक्रार मागे घेते आहे, असं रेणू शर्मा यांनी पोलिसांनी सांगितलं.  तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. डीसीपी अभिषेक त्रिमूखे यांनी संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याचं सांगितलं.

काय म्हणाल्या उमा खापरे…?

रेणू शर्मा यांनी जरी तक्रार मागे घेतली असली तरी भाजपने मात्र यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्यावर दबावाच्या राजकारणाचा आरोप केला आहे. अगोदरपासून तिच्यावर तक्रार मागे घेण्यासंबंधी दबाव होता. आता तिने ही तक्रार मागे घेतली आहे. आम्हाला याचं आश्चर्य वाटत नाही. आमचा मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायकोचा उल्लेख तसंच तिच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला नाही ते कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया उमा खापरे यांनी दिली.

हे सगळं धक्कादायक, रेणू शर्मांवर कारवाई करा

रेणू शर्मा यांनी गंभीर आरोप करुन तक्रार मागे घेतल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. राज्यात याप्रकारचं चुकीचं उदाहरण सेट होऊ देणार नाही, असं म्हणत आता रेणू शर्माविरोधातच कारवाईची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आमच्यासाठी धक्कादायक होते. त्याबरोबरच रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली तेही माझ्यासाठी धक्कादायक आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बलात्कारासारखा गंभीर आरोप करून तो पुन्हा मागे घेणे हा काही खेळ नाही. अशा घटनांमुळे राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

(Thats why Renu sharma withdrawal rape Complaint Against NCP Dhananjay Munde Says BJP Uma Khapre)

संबंधित बातम्या

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे

Dhananjay Munde Case : बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.