Amit Shah : भाजपाचे BMC साठी 150 टार्गेटही ठरलं अन् रणनीतीही आखली, शिंदे गटाचे काय?
मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुशंगाने प्रमुख पक्ष आता मोर्चे बांधणीच्या कामाला लागले आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेतील 150 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक असणार असा निर्धार किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला होता. तर आज अमित शाह यांनी देखील 150 चे टार्गेट येथील पदाधिकारी आणि आमदारांना दिले आहे.
मुंबई : भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) अमित शाह मुंबईत बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल झाले असले तरी या दौऱ्याला (BMC ELection) मुंबई महापालिका निवडणूकांची किनार असणार असा अंदाज होता. पण आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झाला आहे. अमित शाह यांनी मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळातील गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर (BJP Party) भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेवर भाजपचेच कमळ फुलणार असा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. एवढेच नाही तर त्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे त्यांनी पदाधिकारी, आमदार आणि नगरसेवकांना सांगितले आहे. भाजपाने 150 जागांचे टार्गेट ठेवले असेल तरी सोबत शिंदे गट असणार आहे. महापालिका निवडणूक ही शिंदे गटाला सोबत घेऊन लढणार असल्याचेही शाह बैठकीत म्हणाले आहेत.
शिवसेनेपाठोपाठ भाजपाचाही 150 चा नारा
मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुशंगाने प्रमुख पक्ष आता मोर्चे बांधणीच्या कामाला लागले आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेतील 150 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक असणार असा निर्धार किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला होता. तर आज अमित शाह यांनी देखील 150 चे टार्गेट येथील पदाधिकारी आणि आमदारांना दिले आहे. एवढेच नाहीतर पुढचा महापौर हा भाजपचाच असावा अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या आहेत.
शिंदे गटाचा असा हा फायदा
शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. या गटात मुंबईतील आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकांमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्र लढून शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न तर होणारच पण 150 जागांवर दावा केला जात असल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याचा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे.
अशी असणार रणनीती..!
अमित शाह यांनी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत टार्गेटपासून निवडणूकांमध्ये रणनीती काय असणार यावर देखील चर्चा झाली आहे. निवडणूकीच्या अनुशंगाने पदाधिकारी, आमदार आणि नगरसेवक यांना रस्त्यावर उतरुन काम करावे लागणार आहे. मुंबई महापालिका जिंकायची असेल तर हे करावेच लागणार आहे. यासाठी वाटेल ती मदत आता केंद्राकडून केली जाईल असेही शाह म्हणाले आहेत.
25 वर्षापासून महापालिकेत भ्रष्टाचार
गेल्या 25 वर्षापासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. या काळात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरुन लढा उभारला तर विजय आपलाच असा विश्वास आशिष शेलार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. शिवाय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचेही पालन होणार असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.