“स्वातंत्र्यांच्या लढाईत चड्डीवाले इंग्रजांसोबत होते, आम्हाला विकत घ्यायला भाजपला अनेक अंबानी उभे करावे लागतील”
भाजपला अजून खूप घोटाळे करावे लागतील, अंबानी अदानी तयार करावे लागतील. वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला. कारण या घराण्याचं राजकारण सत्तेवर टिकले नाही. वसंतदादा यांचे विचार पैशाने निर्माण झाले नाही. विचाराने गर्दी होते, असं विशाल पाटील म्हणाले. ते सांगलीत कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
सांगली : वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला भाजपला (BJP) अजून घोटाळे करावे लागतील, अंबानीसारखे उभा करावे लागतील. स्वातंत्रच्या लढाईत चड्डी घातलेली लोकं इंग्रजांबरोबर होती. दुर्दैवाने आपल्या नाकर्तेपणामुळे त्यांना दिल्लीचे तक्त मिळाले, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) यांनी भाजपवर केला.
भाजपला अजून खूप घोटाळे करावे लागतील, अंबानी अदानी तयार करावे लागतील. वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला. कारण या घराण्याचं राजकारण सत्तेवर टिकले नाही. वसंतदादा यांचे विचार पैशाने निर्माण झाले नाही. विचाराने गर्दी होते, असं विशाल पाटील म्हणाले. ते सांगलीत कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
भाजपला अजून घोटाळे करावे लागतील
मला बाहेरच्या पक्षातून खूप फोन आले. भांडणं लागली काँग्रेसमध्ये, पण मी मागच्यावेळी सुद्धा सांगितले होते की, वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला भाजपला अजून खूप घोटाळे करावे लागतील अंबानी अदानी तयार करावे लागतील, असं विशाल पाटील म्हणाले.
काही लोक बसले आहेत जे देश चालवतात, देश चालवतात म्हणजे त्यांचा जुना राग काढत आहेत. या स्वातंत्रच्या लढाईत ही आरएसएसची चड्डी घातलेली लोकं इंग्रजांबरोबर होती. दुर्दैवाने आपल्या नाकर्तेपणामुळे त्यांना दिल्लीचे तक्त मिळाले आहे. ते दिल्लीचे तक्त काढून घ्यायचे असल्याने आपल्याला काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्षपद दिलं आहे, असं विशाल पाटील म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी विशाल पाटील यांनी स्वीकारली. यापुढील काळात कार्यकर्ते आणि स्वतःच्या ताकतीच्या जोरावर पद आणि उमेदवारी मिळवू,असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर दिशा संवाद कार्यकर्ताच्या मेळाव्यातून त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार केला आहे.
संबंधित बातम्या
Sangli Congress | सांगली जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर कदम आणि वसंतदादा गटात संघर्ष