Marathi News Politics The cost of living is 56 lakhs the same amount of food the airfare is also in lakhs who is doing the same expenses where did the money come from rain of questions on social media
Eknath Shinde: 56 लाख रहायचा खर्च, तेवढेच खायला, विमान भाडही लाखातच, कोण करतंय एवढा खर्च, कुठून आला पैसा? सोशल मीडियावर सवालांचा पाऊस
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार व इतर अपक्ष मिळून एकूण 46 आमदारांचं त्यांना समर्थन आहे. दोन अपक्ष सहभागी झालेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचा गट मजबूत झाला आहे. त्यांच्या मागण्यांपुढं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना नमतं घ्यावं लागलं.
मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारलं. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक सध्या गुवाहाटीत आहेत. येथे हे आमदार रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये (Radisson Blu Hotel) थांबले आहेत. त्याठिकाणी 70 खोल्या बूक करण्यात आल्या आहेत. सात दिवसांचा बुकिंगचा (Booking) खर्च 56 लाख रुपये आहे. याशिवाय आमदारांचा रोजचा खाण्यापिण्याचा खर्च हा सुमारे 8 लाख रुपये आहे. तसेच विमान (Aircraft) प्रवास याचाही खर्च लाखो रुपयांतच आहे. त्यामुळं हा सर्व खर्च कोण करतंय. एवढा पैसा आला कुठून असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय. सात दिवसांच्या बुकिंगसाठी व खाण्यापिण्यासाठी सुमारे एक कोटी 12 लाख रुपये खर्च झालेत. हॉटेलमध्ये आमदार, खासदार व त्यांचे कुटुंबीयही सहभागी आहेत.
वाचा ट्वीट
सूरत से गुवाहाटी की कोई कमर्शियल फ़्लाइट नहीं है. अब तक एक बोइंग और दो छोटे विमान शिवसेना के विधायकों के साथ उड़ान भर चुके हैं.
मीलिंद खांडेकर यांनी एक ट्वीट केलंय. त्यानुसार, सूरत ते गुवाहाटीला व्यवसायिक प्लाईट नाही. आतापर्यंत एक बोईंग आणि दोन लहान विमान शिवसेनेच्या आमदारांसाठी उडालेत. मोठ्या विमानाचा खर्च सुमारे 40 लाख रुपये आहे. लहान विमानांचा खर्च सुमारे 17 लाख रुपये आहे. हा सर्व खर्च कोण करतोय, असं त्यांनी ट्वीट केलंय.
एकनाथ शिंदे यांचा गट सक्रिय
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार व इतर अपक्ष मिळून एकूण 46 आमदारांचं त्यांना समर्थन आहे. दोन अपक्ष सहभागी झालेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचा गट मजबूत झाला आहे. त्यांच्या मागण्यांपुढं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना नमतं घ्यावं लागलं. संजय राऊत म्हणाले, शिंदे यांच्या मागणीनुसार महाविकास आघाडीतून बाहेर पडता येऊ शकते. परंतु, आमदारांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंसमोर सर्व सांगावं. याशिवाय दबावतंत्राचा वापरही केला जातोय. एकनाथ शिंदेशिवाय 12 आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर शिंदे गटही सक्रिय झाला. शिंदेंकडं शिवसेनेच्या 37 आमदारांचा पाठिंबा आहे. इतर काही अपक्षही त्यांच्या सोबत आहेत.
शिवसेना भवनात संध्याकाळी तत्काळ बैठक
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोरांवर कारवाईचा इशारा दिला. महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी सर्वतोपरी पर्यत्न केला जाणार असल्याचं ते म्हणाले. एकनाथ शिंदे म्हणतात, आमच्याकडं बहुमत आहे. उद्धव ठाकरे हे आम्हाला घाबरविण्याचं काम करत आहेत. संजय राऊत म्हणातात की, फक्त कागदावर त्यांच्याकडं बहुमत आहे. परंतु, यासाठी त्यांना कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल. यानंतर शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकही संभ्रमात सापडले आहेत. काही नगरसेवक शिंदे गटात सहभागी होऊ शकतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शिवसेना संध्याकाळी सात वाजता शिवसेना भवनात तत्काळ बैठक बोलावण्यात आली आहे.