Congress : अध्यक्ष पदासाठी राहुल गांधीची नव्हे तर ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा, कॉंग्रेसमध्ये नेमकी खलबतं काय?

पक्षामध्ये संघटनात्मक बदल व्हावा अशी अपेक्षा शशी थरूर यांनीच अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली होती. त्या दरम्यान, कमलनाथन आणि मनीष तिवारी यांनीही त्यांचे समर्थन केले होते.

Congress : अध्यक्ष पदासाठी राहुल गांधीची नव्हे तर 'या' नेत्याच्या नावाची चर्चा, कॉंग्रेसमध्ये नेमकी खलबतं काय?
कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक आगामी महिन्यात होते आहे.Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 4:20 PM

मुंबई : भाजप पक्ष संघटना मजबुतीकरणावर भर देत आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये अध्यक्ष पदाच्या (Congress President) निवडणुवरुन राळ उडाली आहे. आतापर्यंत या निवडणुकीच्या रिंगणात राहुल गांधी आणि राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नावे चर्चेत होती. मात्र, गांधी कुटुंबातील (Gandhi Family) सदस्य निवडणुकच लढविणार नसल्याची चर्चा राजकीय (Politics) वर्तुळात आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांचे नाव नाहीतर शशी थरुर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी या निवडणुकीसाठी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे ते निवडणुकीत सहभागी होणार हे स्पष्ट झाले आहे. गेल्या 25 वर्षापासून अध्यक्षपद हे गांधी कुटुंबियांकडेच होते. त्यामुळे आगामी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत काय होणार हे पहावे लागणार आहे.

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही आगामी महिन्यात होत असली तरी त्याच्या प्रक्रियेला आतापासूनच सुरवात झाली आहे. उमेदवारी अर्ज वितरीत केले जात आहेत. आजच्या पहिल्याच दिवशी शशी थरूर यांनी आपल्या प्रतिनीधीला पाठवून उमेदवारी अर्ज मागवला आहे.

शशी थरूर यांना अध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आतापर्यंत अशोक गेहलोत यांना कुणाचे आव्हान राहणार याची उत्सुकता होती. शिवाय दुसरी राहुल गांधी यांचेही नाव चर्चेत होते. पण आता निवडणुकीच्या रिंगणात शशी थरूर असणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

पक्षामध्ये संघटनात्मक बदल व्हावा अशी अपेक्षा शशी थरूर यांनीच अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली होती. त्या दरम्यान, कमलनाथन आणि मनीष तिवारी यांनीही त्यांचे समर्थन केले होते. आता प्रत्यक्षात निवडणुका होत असून लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.

20 वर्षानंतर अध्यक्ष पदासाठी निवडणुक होत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत गांधी कुटुंबातील कोणी नसणार असे सांगितले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आले आहे. राहुल गांधी हे भारत जोडो यात्रामध्ये व्यस्त आहेत. शिवाय ते अध्यक्ष होण्यासाठी इच्छूकही नाहीत.

निवडणुकीला आवधी असतानाच गौरव वल्लभ यांनी अशोक गेहलोत यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु असताना थरूर यांनी आपणास पत्र लिहून दुखावल्याचे गौरव वल्लभ यांचे म्हणणे आहे. त्यामुळे निवडणुकांपु्र्वीच गेहलोत यांना समर्थन मिळताना दिसत आहे.

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.