Eknath Shinde Vs. Shiv Sena: शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याचा फैसला दिवाळी नंतर

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा फैसला दिवाळीनंतर म्हणजेच जवळपास एक महिना लांबणीवर गेला आहे.

Eknath Shinde Vs. Shiv Sena: शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याचा फैसला दिवाळी नंतर
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 4:46 PM

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष चांगलाच पेटला आहे. मंगळवारी यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली. धनुष्यबाण कुणाचा? ठाकरेंचा की शिंदेंचा ? पुढची लढाई कोण जिंकणार? या सगळ्याचा फैसला आता निवडणुक आयोगच करणार आहे. मात्र, 16 आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेसह एकूण चार याचिकांवरील सुनावणी आता दिवाळी नंतरच होणार आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात सुरु आहे. राज्यातील या सत्तासंघर्षाची सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

आमदार अपात्रतेसह इतर मुद्यांवर सुप्रीम कोर्टात 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत युक्तीवाद होणार आहे. याचा फैसला दिवाळीनंतर म्हणजेच जवळपास एक महिना लांबणीवर गेला आहे.

या चार याचिकांवर होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

  1. एकून 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान
  2. राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान
  3. शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप
  4. एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप

यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवू नका, जैसे थे परिस्थिती ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तर, खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा निर्णय कोर्टाने निवडणुक आयोगावर सोपवला आहे.

1 नोव्हेंबरला आमदार अपात्र ते सह इतर मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे. सुनावणीवर शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या लढाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.