शरद पवार यांच्याशिवाय पहिली निवडणूक, कसं सामोरे जाणार?, सुनील तटकरे म्हणाले, हे तर अजितपर्व

अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष लोकसभेच्या अधिकाधिक जागा लढविण्यासाठी सज्ज झाला असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीव्ही 9 मराठीचे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमातील मुलाखतीत सांगितले. जागा वाटपात आम्हाला अधिक जागा मिळतील आणि महायुती 45 जागांहून अधिक जागा जिंकेल असेही तटकरे यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या शिवायची ही पहिली निवडणूक आहे. यावर प्रतिक्रीया देताना ते म्हणाले की पक्षात आता अजितपर्व सुरु झाले आहे.

शरद पवार यांच्याशिवाय पहिली निवडणूक, कसं सामोरे जाणार?, सुनील तटकरे म्हणाले, हे तर अजितपर्व
Sunil TatkareImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 3:40 PM

मुंबई | 1 मार्च 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर अजित पवार यांनी स्वतंत्रगट स्थापून महायुतीत उपमुख्यमंत्री पद मिळविले. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देखील दिले. त्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीव्ही 9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये मुलाखत दिली आहे. शरद पवार यांच्या नंतर पहिली निवडणूक येत आहे. यास कसं सामोरे जाणार या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीत आता अजितपर्व सुरु झाल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीत भली मोठी फूट होऊन 53 पैकी तब्बल 43 आमदारांची अजितदादा पवारांना साथ मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. अर्थात या निकालाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देखील देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर आता शरद पवार गटाला नवे नाव आणि तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील अनेकजण अजित पवारांच्या नेतृत्व मानायला तयार आहेत. ज्याला कुणाला यायचं असेल त्यांनी यावे असे आवाहनच सुनील तटकरे यांनी केले आहे.

अजितपर्व सुरु

आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढविणार असून पूर्ण ताकदीने निवडणूकीला सामोरे जाणार आहे. घड्याळ तेच आहे, घड्याळ तेच पण वेळ नवी आहे. अजितदादांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीतून आम्ही उभे राहत आहोत. राज्यात अजितदादांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीत आता ‘अजितपर्व’ सुरू होऊ शकते. आमचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. दादांच्या नेतृत्वातील पहिली निवडणूक लढताना स्ट्रायकिंग रेट 100 टक्के सुरू ठेवणार आहोत. राष्ट्रवादीत आता अजित पर्व सुरू झालं आहे असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. बारामती लोकसभा निवडणूक सुनेत्रा पवारच लढविणार आहेत. महायुतीत कोणती अडचण नाही. जागा वाटपात कोणतीही अडचण येणार नाहीय. महायुतीचे लोकसभेच्या 45 हून अधिक जागा जिंकण्याचं उद्धिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.