Rupali Thombare : गद्दारांबाबतची पहिली प्रतिक्रिया पुण्यात उमटली, ठोंबरेंनी सावंतांना तर खेकडेवाले म्हणूनच हिणवले

बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ठपका ठेवत ही भूमिका घ्यावी लागल्याचे सांगितले होते. मात्र, मुळात ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी ती केली आहे. याच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा काहीही संबध नाही. ही बाब आता शिवसैनिकांच्याही लक्षात आली आहे. त्यामुळेच पुण्यात जे घडले त्याचीच ती प्रतिक्रिया असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले आहे.

Rupali Thombare : गद्दारांबाबतची पहिली प्रतिक्रिया पुण्यात उमटली, ठोंबरेंनी सावंतांना तर खेकडेवाले म्हणूनच हिणवले
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 4:47 PM

पुणे :  (Rebel MLA) बंडखोर नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत नवीन गटाची स्थापना केली. तेव्हापासून शिवसैनिकांच्या मनात राग हा कायम आहे. आतापर्यंत शिवसैनिकांनी संयम बाळगला पण आता संयमाचा बांध सुटला असून पुण्यात जे झालं तीच गद्दारांबाबतची खरी प्रतिक्रिया असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या (Rupali Thombare) रुपाली ठोंबरे यांनी सांगितले आहे. पुण्यात मंगळवारी शिवसैनिकांना (Uday Samant) उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घातला तर यामध्ये त्यांची गाडीही फोडण्यात आली. त्यामुळे खाद्या बायकोसोबत अडीच वर्ष संसार करायचा आणि मग कुरघोड्या काढायच्या ही जुनी सवय आहे, अडीच वर्ष हेच उदय सामंत मंत्री राहिले आणि आता ईडी सीबीआय मागे लागली म्हणून बंडखोरी केली म्हणून त्यांना आता काय बोलावं ते सुचत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली आहे.

तानाजी सावंत तर खेकडेवाले

शिंदे गटाच्या स्थापनेमध्ये आ. तानाजी सावंत यांचाही मोठा रोल असल्याचे बोलले जात आहे. शिवाय कोण आदित्य ठाकरे म्हणणारे तानाजी सावंत हे आता चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र, तानाजी सावंत हे एक खेकडेवाले म्हणत ठोंबरे यांनी त्यांच्यावर खोचक टिका केली आहे. यापूर्वी तानाजी सावंत यांनी एक धरण हे खेकड्यामुळे फुटल्याचे सांगितले होते. त्यामुळे सोशल मिडियावर या विधानाला घेऊन टिका करण्यात आली आहे. त्याचीच री ओढत ठोंबरे यांनी त्यांना खेकडेवाले म्हणून हिणवले आहे. ज्या पक्षामुळे आपली ओळख झाली त्याच पक्षातील नेतृत्वाला असा सवाल उपस्थित करायचा यावरुन रुपाली ठोंबरे यांनी टिकास्त्र केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा काही संबंध नाही

बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ठपका ठेवत ही भूमिका घ्यावी लागल्याचे सांगितले होते. मात्र, मुळात ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी ती केली आहे. याच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा काहीही संबध नाही. ही बाब आता शिवसैनिकांच्याही लक्षात आली आहे. त्यामुळेच पुण्यात जे घडले त्याचीच ती प्रतिक्रिया असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले आहे. त्यांना स्वार्थापोटी गद्दारी ही करायचीच होती. केवळ राष्ट्रवादीचे निमित्त पुढे करुन त्यांनी हे पाऊल उचलले होते. आता त्याचेच हे परिणाम आहेत असेही त्या म्हणाल्या.

म्हणून उदय सामंतांची बंडखोरी

विकासाचे आणि निधी मिळत नसल्याचे कारण सांगत ज्यांनी शिवसेनेतून बंड केले त्यांची कारणे ही वेगळीच असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले आहे. अडीच वर्ष हेच उदय सामंत मंत्री राहिले आणि आता ईडी सीबीआय मागे लागली म्हणून बंडखोरी केली म्हणून त्यांना आता काय बोलावं ते सुचत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. केवळ स्वार्थ आणि ईडीच्या कारवाईच्या भितीने त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.