मोदींच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्र्याची काँग्रेसशी ‘हात’मिळवणी!

नवी दिल्ली : एकीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे भाजपप्रणित एनडीएचा एक एक मित्र साथ सोडतोय, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीएने एनडीएतील मित्रपक्षांना खेचण्यात यश मिळवलंय. बिहारमधील राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी महागठबंधनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. कुशवाह यांच्यासोबतच बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवास मोर्चाचे अध्यक्ष जितन राम मांझी, […]

मोदींच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्र्याची काँग्रेसशी 'हात'मिळवणी!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

नवी दिल्ली : एकीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे भाजपप्रणित एनडीएचा एक एक मित्र साथ सोडतोय, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीएने एनडीएतील मित्रपक्षांना खेचण्यात यश मिळवलंय. बिहारमधील राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी महागठबंधनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.

कुशवाह यांच्यासोबतच बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवास मोर्चाचे अध्यक्ष जितन राम मांझी, आरजेडीचे तेजस्वी यादव यांना काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये मित्र पक्षांना जोडण्यास यश मिळालंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसचं हे मोठं यश मानलं जातंय.

राजधानी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयमध्ये आरजेडी नेते तेजस्वी यादव, दलित नेते जितन राम मांझी, शरद यादव, उपेंद्र कुशवाह, काँग्रेसचे खासदार अहमद पटेल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बिहारमध्ये समविचारी पक्षांची महाआघाडी तयार केली असल्याची घोषणा करण्यात आली.

भाजपप्रणित एनडीएमध्ये भाजपसह शिवसेना, शिरोमनी अकाली दल, अपना दल असे जवळपास विविध राज्यातील 44 पक्ष आहेत. तर काँग्रेसप्रणित यूपीएमध्ये 15 पेक्षा जास्त पक्ष आहेत. उपेंद्र कुशवाह यांचा पक्षही आता महाआघाडीमध्ये आला आहे. तर आंध्र प्रदेशातील सत्ताधारी टीडीपीही महाआघाडीत सहभागी होऊ शकतो. कारण, तेलंगणात काँग्रेस आणि टीडीपीने एकत्र निवडणूक लढवली होती.

एनडीएमध्ये आदर मिळत नसल्याचं सांगत उपेंद्र कुशवाह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसशी जवळीक साधली. महाआघाडीत आदर दिला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. छोट्या पक्षांची मनधरणी करणं हे भाजपसमोर आव्हान बनलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.