Eknath Shinde : जनतेला आपलसं वाटणारं सरकार, मुख्यमंत्र्यांनी सांगितला अडीच महिन्यातील अनुभव

सत्तांतर झाल्यानंतर जो आनंद सर्वसामान्य जनतेला झाला होता तोच आजही त्यांच्या चेहऱ्यावर आहे. त्यानंतर राज्यात होत असलेल्या सणासुदीवर कोणतेही निर्बंध नसल्याने जनतेचा उत्साह शिघेला पोहचला आहे. मागील दोन वर्ष राज्यात उदास वातावरण होते. पण आता सर्वकाही बदलल्याने नागरिकांच्या जीवनमानातही बदल होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

Eknath Shinde : जनतेला आपलसं वाटणारं सरकार, मुख्यमंत्र्यांनी सांगितला अडीच महिन्यातील अनुभव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 5:06 PM

ठाणे : आतापर्यंत (Shiv sena Party) शिवसेनेकडून टीका केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल प्रतिक्रिया देत नव्हते. पण शिंदे गटाचा वारंवार गद्दार असा उल्लेख केला जात असल्याने (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनीही शिवसेनेवर आणि पक्षप्रमुखांवर देखील (Blunt criticism) बोचरी टीका करण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात सणासुदीत देखील उदास वातावरण होते. मात्र, आमचे सरकार सत्तेत येताच यंदाचे सणोत्सव हे दणक्यात होणार असल्याचे जाहिर केले होते. शिवाय ज्यांच्याजवळ येऊ वाटते अशांना लोकही जवळ करतात. म्हणून दाखल होताच हजारोंची गर्दी होत आहे. आता ज्यांच्या जवळ लोकांनाच जाऊ वाटत नाही, त्यांच्याबद्दल काय सांगणार असा खोचक टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यावरुन त्यांनी पक्ष नेतृत्वालाच अव्हान दिले आहे.

सत्तांतरानंतर सर्वकाही उत्साहात

सत्तांतर झाल्यानंतर जो आनंद सर्वसामान्य जनतेला झाला होता तोच आजही त्यांच्या चेहऱ्यावर आहे. त्यानंतर राज्यात होत असलेल्या सणासुदीवर कोणतेही निर्बंध नसल्याने जनतेचा उत्साह शिघेला पोहचला आहे. मागील दोन वर्ष राज्यात उदास वातावरण होते. पण आता सर्वकाही बदलल्याने नागरिकांच्या जीवनमानातही बदल होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

जनतेचा गराडा हीच कामाची पावती

गेल्या 10 दिवसांपासून उत्सावाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावली आहे. जनतेला आपल्याजवळ येऊ वाटते हीच मोठी गोष्ट आहे. अन्यथा काहींच्या जवळ जाण्यासही जनता धजत नाही असे चित्र असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दिवसभरात 10 ते 20 मंडळांना भेटी आणि बाप्पांचे दर्शन यामुळे जनतेशी संपर्क तर राहिलाच पण मी दाखल होताच जनतेचा गराडा पडत होता. हीच आपल्या कामाची पावती असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

विरोधकांवर सडकून टीका

दसरा मेळाव्याबाबत वेळ आली की सांगितले जाणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल कुणाच्या हाती होते हे सर्वसामान्य जनतेला देखील ज्ञात होते. पण हे हातचे रिमोटच गेल्याने आता राष्ट्रवादीमध्ये चिडचिड होत असल्याचे म्हणत त्यांनी खा. सुप्रिया सुळे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे याकूब मेनन हा बॉम्ब ब्लास्टचा आरोपी होता. त्याला फाशी दिली गेली असली तरी, त्याचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही. पोलिस आणि मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत गृह विभाग योग्य ती कारवाई करेल असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.