मराठा आरक्षाचा प्रश्न मार्गी लागणार; उदयनराजे, संभाजीराजे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्वाची बैठक

14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.

मराठा आरक्षाचा प्रश्न मार्गी लागणार; उदयनराजे, संभाजीराजे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्वाची बैठक
मराठा समाजाला आणखी एक धक्का, EWS आरक्षणही रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 8:29 PM

मुंबई : ओबीसींपाठोपाठ मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटणार आहे. तशा प्रकारचे संकेत नव्या शिंदे-फडणवीस सरकारकडून मिळत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू तसेच आरक्षणासंबंधित लवकरच बैठक घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला दिले होते. त्यानुसार या बैठकीची तारीख निश्चित झाली आहे. 14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला छत्रपती उदयनराजे भोसले(Chhatrapati Udayanraje Bhosale), संभाजीराजे भोसले( Sambhajiraje Bhosale), मराठा क्रांती मोर्चा(Maratha kranti morcha) पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.

14 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह येथे ही मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला निमंत्रित करण्यात आलेले बहुतेक जण हे मुंबई बाहेर असल्यामुळे ते या बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली. या बैठकीला छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ओबीसी आरक्षण मिळालं तसंच मराठा समाजाला मिळणार

मराठा आरक्षणासाठी मागील अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. हे आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं तेव्हा सर्वांनी मेहनत करुन आरक्षण दिलं, पण आता ते सुप्रीम कोर्टात आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सरकार करेल. मराठा आरक्षणासाठी जे काही प्रयत्न लागणार आहे ते सरकार करेल, मराठा समाजाच्या मागे सरकार उभं आहे. आपलं सरकार आल्या आल्या ओबीसी आरक्षण मिळालं तसंच मराठा समाजाला मिळणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

नारायण राणे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी लढा उभारला गेला

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. सुरूवातील नारायण राणे यांच्या नेतृत्वात हा लढा उभारला गेला. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. मात्र हे आरक्षण कोर्टात टिकलं नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टातला संघर्ष सुरू झाला. मात्र गेले अनेक वर्षे प्रयत्न करूनही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारला अपयश आलं आहे. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघताना दिसत असताना मराठा समजालाही आरक्षण मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.