VIDEO: पंतप्रधान ‘द काश्मीर फाईल्स’चे प्रचारक, सिनेमाच्या माध्यमातून राजकीय अजेंडा राबवला जातोय, संजय राऊतांची खोचक टीका

'द काश्मीर फाईल्स' या सिनेमावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना फटाकरलं आहे. द काश्मीर फाईल सिनेमावरूनही काश्मीर फाईल वादात सापडलेला नाही.

VIDEO: पंतप्रधान 'द काश्मीर फाईल्स'चे प्रचारक, सिनेमाच्या माध्यमातून राजकीय अजेंडा राबवला जातोय, संजय राऊतांची खोचक टीका
सिनेमाच्या माध्यमातून राजकीय अजेंडा राबवला जातोय, संजय राऊतांची खोचक टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 10:59 AM

नवी दिल्ली: ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना फटाकरलं आहे. द काश्मीर फाईल सिनेमावरूनही काश्मीर फाईल वादात सापडलेला नाही. हा सिनेमा भाजपच्या (BJP) माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान स्वत: त्या चित्रपटाचे प्रचारक आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. 32 वर्षापूर्वीचा आक्रोश, इतिहास, वेदना त्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचं कौतुक केलं पाहिजे. या सिनेमात अनेक सत्य दडपली आहेत. ताश्कंद फाईल हा सिनेमा त्याच निर्मात्याकडून प्रसिद्ध झाला आणि लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं खापर एका कुटुंबावर फोडण्यात आलं. हा एक राजकीय अजेंडा या माध्यमातून राबवला जात आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताा काश्मीर फाईल्स सिनेमाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली. काश्मीरची वेदना जेवढी शिवसेनेला माहीत आहे, तेवढी अन्य कुणाला माहीत असेल मला वाटत नाही. काश्मिरातील प्रश्नावर आणि काश्मिरी पंडितांच्या वेदनेवर सातत्याने आवाज उठवणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या काळातील एकमेव नेते होते. ते केवळ आवाज उठवून थांबले नाहीत तर महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं आणि काश्मीर पंडितांचं शिष्टमंडळ जेव्हा त्यांना भेटायला आलं तेव्हा काश्मिरी पंडितांची अस्वस्थता त्यांनी पाहिली. त्यांनी विचारलं मी तुमच्यासाठी काय करू शकतो? माझ्या हातात शस्त्र असती तर माझ्या शिवसैनिकांना शस्त्र घेऊन तुमच्यासाठी पाठवलं असतं. त्यावेळी त्यांनी काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या, अशी त्यांनी जाहीरपणे मागणी केली होती. त्यांना त्यांच्या मालमत्तांचं कुटुंबांचं रक्षण करू द्या, त्यांच्या हातात एके 47 द्या अशी मागणी शिवसेना प्रमुखांनी केली होती, याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं.

शिवसेनाप्रमुखांनी 5 टक्के आरक्षण दिलं

आम्ही आमच्या देशात निर्वासित झालोय. केंद्र सरकार आणि राज्यपालांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे. आमच्या मुलांचं शिक्षण होऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला शिक्षणात राखीव जागा द्या, अशी विनंती काश्मिरी पंडितांनी शिवसेना प्रमुखांकडे केली होती. त्यावेळी देशातील माझ्या हातात काही नाही. पण महाराष्ट्रात वैद्यकीय, इंजीनियरिंग क्षेत्रात तुम्हाला 5 टक्के जागा राखीव ठेवण्याचं फर्मान देतो. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. शिवसेना प्रमुखांनी लगेच त्यांना फोन करून सांगितलं विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी महाराष्ट्रात 5 टक्के जागा राखीव ठेवा. तसा कायदा करून घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. त्यामुळे काश्मीरची वेदना जेवढी आम्हाला कळते तेवढी इतरांना कळत नाही, असंही ते म्हणाले.

भाजपशासित राज्यांनी काश्मीर पंडितांसाठी काय केले?

काश्मीर फाईल हा सिनेमा टॅक्स फ्रि केला जात नसल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यावरूनही त्यांनी विरोधकांना झापले. टीका करण्याला काही अर्थ नाही. हा काही राजकीय अजेंडा नाही. महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांसाठी आम्ही करून दाखवलं. भाजप शासित कोणत्या राज्याने काश्मिरी पंडितांच्या मुलासाठी काय केलं? केवळ सिनेमा टॅक्स फ्रि केल्याने त्यांच वेदना संपवता येणार नाही. 32 वर्षानंतर तुम्हाला आठवतंय? कारण पुढे चार राज्यांच्या निवडणुका आहेत. हे राजकारण आहे. आम्ही त्या पिढीला 32 वर्षापूर्वी दिलं आहे. उगाच इतिहास तोडूनमोडून लोकांसमोर आणू नका. काश्मीरची लढाई ही देशाची लढाई होती. काश्मीरमध्ये शिखांचीही हत्या झाली. राष्ट्रभक्त मुस्लिमांचीही हत्या झाली आहे. त्यावेळी फक्त बाळासाहेबांनी आवाज उठवला. बाकी सगळे अळीमिळी गुपचिळी गप्प होते. त्यांना अतिरेक्यांची भीती वाटत होती, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

VIDEO: राज्यपाल राजकारण करताहेत, त्यांना पदावर ठेवणं अयोग्य; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ, राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक नाशिकमध्ये; तुमच्या जिल्ह्यात किती?

Maharashtra News Live Update : राज्यातील पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रडताय का ? – संजय राऊत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.