Explainer | पंतप्रधान मोदी यांच्यानंतर येणारा नेता अधिक कट्टर असेल… का म्हणाले असं रणनीतीकार?

पंतप्रधान मोदी यांनी अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन करून भाजप हाच खरा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे दाखवून दिले. मोदी यांची जगभरात कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख होतीच. पण, राम मंदिरामुळे त्यांच्या या लौकिकात आणखीनच भर पडली.

Explainer | पंतप्रधान मोदी यांच्यानंतर येणारा नेता अधिक कट्टर असेल... का म्हणाले असं रणनीतीकार?
PM NARENDR MODIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 4:15 PM

नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : 2014 पासून भाजपने लोकसभा त्यासोबत अन्य राज्यात झालेल्या निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकल्या आहेत. 2019 च्या निवडणुकामध्ये तर भाजपच्या मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने आपल्या युक्तीने देशातील एकेका राज्यात भाजपची सत्ता आणली. आताही 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप करत आहे. यावेळीही पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून भाजपने पुन्हा एकदा मोदी यांनाच पुढे आणले आहे. मात्र, भाजप आज सर्व निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकत असला तरी पुढे काय? असा प्रश्न समोर आला आहे.

जसं जशी निवडणूक जवळ येत आहे तसं तशी भाजपची व्यूहरचना आक्रमक होताना दिसत आहे. भाजपने अनेक राज्यातील पक्ष फोडले आणि स्वतःची सत्ता आणली. महाराष्ट्र आणि नुकताच सत्ता पालट झालेले बिहार ही दोन राज्ये याची मोठी उदाहरणे आहेत. भाजप पर्यायाने मोदी यांना पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झाली. पण, भाजपने विरोधी पक्षांची एकजूट नष्ट व्हावी यासाठी थेट नितीशकुमार यांनाच सोबत आणले.

पंतप्रधान मोदी यांनी अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन करून भाजप हाच खरा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे दाखवून दिले. मोदी यांची जगभरात कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख होतीच. पण, राम मंदिरामुळे त्यांच्या या लौकिकात आणखीनच भर पडली. पण, हीच ओळख आता भाजप आणि मोदी यांच्यासाठी एक मोठी समस्या बनली आहे.

भाजपला देशात जनाधार नसताना निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर त्यांच्या सोबतीला आले. भाजपला त्यांनी निवडणूक जिंकून दिली. मात्र, त्यानंतर त्यांचे भाजपसोबत बिनसले. भाजप, काँग्रेस, टीएमसी यासारख्या काही पक्षांसाठी प्रशांत किशोर यांनी काम केले आहे. याच रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय.

‘नरेंद्र मोदी सतत आपली प्रतिमा बदलत आहेत. त्यामुळेच त्यांना सातत्याने निवडणुकीत यश मिळत आहे. पंतप्रधान मोदी ही भाजपची मोठी ताकद आहे. पण, भाजपसाठी सर्वात मोठी समस्याही तीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाजप जास्त अवलंबून आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न आल्यास त्यांच्यानंतर हायकमांडमध्ये जो कोणी असेल तो त्यांच्यापेक्षाही जास्त कट्टर असेल असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

प्रशांत किशोर यांनी भाजप आणि जेडीयूमधील संबंधांवरही भाष्य केले. भाजपने जेडीयूला आधीच गिळंकृत केले आहे. नितीश कुमार यांना हे माहित आहे. पण, जो काही वेळ शिल्लक आहे तितका काही काळ त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहायचे आहे. 18 वर्षे ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांच्या खेळीचा हा शेवटचा टप्पा आहे असेही ते म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.