Uddhav Thackeray : मोदीपर्व संपले, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे असे का म्हणाले..! नेमका निशाणा कुणावर?

निवडणुकांच्या तोंडावर कोण काय बोलते यावर जनतेचे बारीक लक्ष असते. शिवाय राज्यातील झालेले राजकारण हे जनतेला ज्ञात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता याना मतपेटीतून याचे उत्तर देईलच असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray : मोदीपर्व संपले, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे असे का म्हणाले..! नेमका निशाणा कुणावर?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 6:47 PM

मुंबई :  (Shivsena Party) शिवसेनेतून बंड करुन शिंदे गटात सहभागी झालेले आमदार हे आजही बाळासाहेबांचे नाव घेऊनच भाषणाची सुरवात करतात. शिवाय बाळासाहेब यांचे विचार जोपासण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे ते सांगतात. मात्र, आता (Municipal Election) महापालिकेच्या निवडणुक तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवायची असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हणले होते. या विधानाला घेऊन (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणीसांवर खोचक टीका केली आहे. बाळासाहेबांच्या नावाने आता मताचा जोगवा मागितला जात आहे म्हणजे, मोदीपर्व संपले असल्याची कबुलीच म्हणावे लागेल असे म्हणत केवळ राजकीय स्वार्थासाठी हा सर्व खटाटोप केला जात असल्याचा आरोपही त्यांनी भाजपावर केला आहे.

भाजपाचा हा केविलवाणा प्रयत्न

नाही म्हणलं तरी आता महापालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. यातच आता टायमिंग साधत पक्षाची धोरणे आणि मत परिवर्तनच्या अनुशंगाने जो तो प्रयत्न करीत आहे. मात्र, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून मताचा जोगवा म्हणजे मत मागण्यासाठी भाजपाचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. असे असले दुसरीकडे मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे फडणवीस यांनी अधोरेखित केले आहे. भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार , या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

जे स्वप्न मुंबईकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें यांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे ही आपली जबाबदारी आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचं स्वप्न धुळीस मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत, ते इतके आत्ममग्न, इतके आत्मकेंद्रीत होते की, स्वतःच्या पलीकडे पाहू शकले नाहीत. मुंबईकराकडे त्यांनी कधीही बघितले नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचे आहे. जे स्वप्न वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले आहे, ते पुर्ण करण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे त्यासाठी कामाला लागा असे आवाहन, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

हे सुद्धा वाचा

जनताच उत्तर देईल

राजकीय स्वार्थासाठी कोण कोणत्या स्थराला जाईल हे सांगता येत नाही. त्याच अनुशंगाने आता एवढे सर्व होऊन देखील मतासाठी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जात आहे. हे सर्व जनतेच्या लक्षात येतेच. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर कोण काय बोलते यावर जनतेचे बारीक लक्ष असते. शिवाय राज्यातील झालेले राजकारण हे जनतेला ज्ञात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता याना मतपेटीतून याचे उत्तर देईलच असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.