महापालिका शिवाजी पार्क मैदान देईल पण कुणाला? नारायण राणेंनी सांगितले महापालिकेचे गणित
मेळाव्यासाठी मैदान कुणाला हा महापालिका निर्णय घेईल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारने केवळ छापाछापी केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
मुंबई : (Dussehra rally) दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणाला यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गट आणि शिवसेना दोन्हीकडून (Shivaji Park) शिवाजी पार्क मैदानावरच मेळावा होणार असा दावा केला जात आहे. याबाबत भाजपाने आतापर्यंत महापालिका यावर निर्णय घेईल असेच म्हटले होते. पण आता या वादात (Narayan Rane) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली आहे. शिवसेनेला महापालिका का मैदान देत नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, खरी शिवसेना असलेल्या शिंदे गटालाच दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही डुप्लीकेट असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.
मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हेच मैदान मिळावे यासाठी शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडूनही महापालिकेकडे अर्ज केला गेला आहे. आता निर्णय घ्यावाच लागणार असल्याने महापालिकेनेही हालचाली सुरु केल्या आहेत. विधी विभागाने अर्जाची पाहणी केली असून परवानगीबाबत कायदेशीर बाजू तपासली जात आहे. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी शिवाजी पार्कवरही दाखल होणार आहेत.
खरी शिवसेना कुणाची हा निर्णय कोर्टात रखडला असला तरी दोन्ही गटाकडून आमचीच खरी शिवसेना असा दावा केला जात आहे. मात्र, महापालिका परवानगी कोणत्याच गटाला कशी देत नाही असा सवाल नारायण राणे यांना विचारण्यात आला होता. पण जी खरी शिवसेना त्यालाच परवानगी मिळेल असे म्हणत राणेंचा कल कुणीकडे हे आता नव्याने सांगायची गरजच नाही.
मेळाव्यासाठी मैदान कुणाला हा महापालिका निर्णय घेईल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारने केवळ छापाछापी केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही डु्प्लीकेट असल्याचे म्हणत हिणवलेही आहे.