इतिहासात ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल, पण कोणत्या कारणासाठी? फडणवीसांनी सांगितलं!

Devendra Fadnavis : नारायण राणेंची 9 तास चौकशी केल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलंय. महाराष्ट्र सरकार आकसानं आणि सूड बुद्धीनं कारवाई करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

इतिहासात ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल, पण कोणत्या कारणासाठी? फडणवीसांनी सांगितलं!
मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीसांचं वक्तव्यImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 3:20 PM

मुंबई : इतिहासात ठाकरे सरकारचं (Thackeray Government) नाव नोंदवलं जाईल, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय. नारायण राणे यांच्यावर सूड बुद्धीनं महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केली. नारायण राणेंची (Narayan Rane) 9 तास चौकशी केल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलंय. महाराष्ट्र सरकार आकसानं आणि सूड बुद्धीनं कारवाई करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार हे सर्वात जास्त आकसानं वागणारं सरकार म्हणून ठाकरे सरकारची इतिहासात नोंद होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय. दिशा सालीयनप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरुन नारायण राणे यांची चौकशी करण्यात आली होती. त्यावरुन फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, की…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर झालेली कारवाई सूडबुद्धीची होती. तुम्ही 41ची नोटीस दिलीये. राणेंवरील गुन्हा काही दाऊदशी संबंधित नाही. जे सेक्शन लावलेत, त्यात फिर्यादी आणि राणेंचा थेट सामना झाला पाहिजे. पण तो कधीच झालेला नाही. नारायण राणेंनी अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तरिही केंद्रीय मंत्र्यांना बोलवून 9-9 तास बसवून ठेवयाचं. हे जे काही चाललंय, ते योग्य नाही. देशाच्या इतिहासात सर्वात जास्त आकसानं वागणारं सरकार म्हणून ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल..

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारसोबत पोलिसांवरही जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील पोलिस हे खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोपही यावेळी फडणवीसांनी केला. आमदार रवी राणा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरुन आणि त्यांच्याविरोधात लावण्यात आलेल्या कलमांवरुनही फडणवीसांनी निशाणा साधलाय.

पोलिसांवर हल्लाबोल!

‘आमदार रवी राणांविरोधात 307चा गुन्हा दाखल करण्यात आला. मौका मिळाला तर विरोधी पक्षाच्या आमदारांना चिरडून टाका, हा जो स्वभाव पोलिसांमध्ये आलाय आणि पोलिस जर असे खोटे गुन्हे दाखल करणार असतील, तर महाराष्ट्राचा बंगाल व्हायला वेळ लागणार नाही’, अशी भीती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्याबाबतचं प्रकरण पुढं आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एका भाजप आमदाराचा फोनही जर पोलिस अधिकारी घेत नसेल तर ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय. पोलिसांचा अहंकार वाढला असून याप्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकार पळपुटं, वीज कापणं बंद होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

वैराग्य दाखवून बगल में छुरी घेऊन फिरायचं, भाजप नेते गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सणसणीत टीका!

नारायण राणेंना 9 चा फेरा, मुंबईतल्या अधिश बंगल्यात किती ठिकाणी बेकायदा बांधकाम? बीएमसीची नोटीस

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.