Sanjay Raut : मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
मराठवाड्यात खूप वर्षानंतर असी विराट सभा होते असल्याचे म्हणत 37 वर्षापूर्वी जेव्हा इथं शाखा स्थापन झाली तेव्हा कुणाला वाटलंही नसेल की उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि तेही मुख्यमंत्री म्हणून असे ते म्हणाले.
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून शिवसेनेला (Shiv Sena) हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचले जात होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आपण याची उत्तरे ही नक्की देऊ. मात्र कधी हे त्यावेळी माहीत नव्हते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभेची घोषणा केली आणि राज्यासह शिनसेनेत जल्लोषाचे वातावरण तयार झाले. दरम्यान ही सभा आज औरंगाबाद सुरू झाली असून मुख्यमंत्री ठाकरे आज काय बोलणार याकडे राज्याच्या जनतेचे लक्ष लागले होते. दरम्यान आज सभेत अनेक नेत्यांनी आपली भाषणे केली. त्यात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Shiv Sena leader and MP Sanjay Raut) यांनीही भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचणाऱ्यांना निशाणा केला. तसेच त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच ते म्हणाले, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे.
खूप वर्षानंतर असी विराट सभा
तसेच व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर सगळेच शिवसेनेचे वाघ आहेत आणि वाघाचा बाप पाच मिनिटात येत असल्याचे राऊत म्हणाले. त्याचबरोबर मराठवाड्यात खूप वर्षानंतर असी विराट सभा होते असल्याचे म्हणत 37 वर्षापूर्वी जेव्हा इथं शाखा स्थापन झाली तेव्हा कुणाला वाटलंही नसेल की उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि तेही मुख्यमंत्री म्हणून असे ते म्हणाले.
औलाद अजून जन्माला यायची आहे
त्याचबरोबर उपस्थित गर्दीवर बोलताना ते म्हणाले, काय ही गर्दी… असं वाटतं की समुद्राच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटेचा तडाखा भाजपला बसला तर पाणी मागायलाही उठणार नाहीत. अशी प्रचंड लाट इथे उसळली आहे. ही लाट पाहून मी इतकंच सांगतो ही आंधी है तुफान है… कोई तोड नहीं है उद्धव ठाकरे का… तर ही लाट दिल्लीच्या तख्तालाही हादरे दिल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र, हा मराठवाडा कुणाचा ही सांगणारी ही सभा आहे. काही लोक मधल्या काळात येऊन गेले. पण मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणाऱ्याची औलाद अजून जन्माला यायची आहे.
हा मराठवाडा ज्याने औरंगजेबाला या मातीत गाडलं. हाच मराठवाडा ज्याने निजामाला पळवून लावलं… आणि हिच शिवसेना जी निजामाच्या बापाच्या छाताडावर पाय देऊन सत्तेत आली आहे. आता आम्हाला हटवणं तुम्हाला शक्य होणार नाही. ही गर्दी, ही शक्ती एवढंच सांगते आमच्या वाट्याला जाऊ नका, आमचा नाद करु नका.