Buldhana : पक्षामुळेच नाही, तर निवडणूक जिंकण्यासाठी लायकीही लागते, आदित्य ठाकरेंच्या टिकेला आ. संजय गायकवाडांचे उत्तर

शिवसेनेत फूट ही राज्यातील जनतेच्या दृष्टीने चांगली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. असे असतानाही ठाकरे कुटुंबियांबद्दल कोणताही आमदार हा खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत नाही. असे असताना मात्र, आदित्य ठाकरे हे सातत्याने आमच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे गायकवाडांनी सांगितले आहे. असेच सुरु राहिले तर मग आमच्या सहनशीलतेचा अंत होईल असेही ते म्हणाले आहेत.

Buldhana : पक्षामुळेच नाही, तर निवडणूक जिंकण्यासाठी लायकीही लागते, आदित्य ठाकरेंच्या टिकेला आ. संजय गायकवाडांचे उत्तर
आदित्य ठाकरे आणि आ. संजय गायकवाड
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 2:56 PM

बुलढाणा : हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम ठेवण्यासाठी शिवसेनेतील आमदारांनी एक उठाव केला आहे. हिंदुत्व जोपासयाचे असते तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत बसलेच नसते. त्यांच्यासोबत बैठका आणि त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होत असतानाही घेतलेली भूमिका हिंदुत्वाची प्रतारणा करणारी नाही का? असा सवाल (MLA Sanjay Gaikwad) आ. संजय गायकवाड यांनी (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांना विचारलेला आहे. आ. आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या दरम्यान शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असून भविष्यात दंगलीही घडवल्या जातील अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. याला उत्तर देताना आ. संजय गायकवाड यांनी हिंदुत्वाची जोपासणा कोण करतंय हे सर्व (Maharashtra) महाराष्ट्राला माहिती झाले आहे. शिंदे गटच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात असल्यााचे सांगत निवडूण येण्यासाठी केवळ पक्षच महत्वाचा असे नाहीतर त्या उमेदवराचे वजनही तेवढेच महत्वाचे असल्याचे सांगितले आहे.

निवडणुक जिंकण्यासाठी पक्षाचे योगदान कमीच

आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने आरोप होत आहे की, पक्षाचे लेबल काढून तु्म्ही निवडून येऊन दाखवा. या टीकेला आतापर्यंक कोणी उत्तर दिले नव्हते पण संजय गायकवाड यांनी मात्र, निवडणुक केवळ पक्षाच्या जीवावर होत नाहीतर स्थानिक पातळीवर उमेदवराचे वर्चस्व आणि योगदान यावरच सर्वकाही अवलंबून असते. उमेदवाराच्या निवडूण येण्यामध्ये पक्षाचे योगदान केवळ 20 टक्के असल्याचे म्हणत त्यांनी केवळ पक्षाच्या जीवावर निवडून येऊन दाखवा असे आव्हानही त्यांनी आदित्य ठाकरे यांना केले आहे.

एकीसाठी कायम प्रयत्न, पण सर्वकाही निष्फळ

शिवसेनेत फूट ही राज्यातील जनतेच्या दृष्टीने चांगली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. असे असतानाही ठाकरे कुटुंबियांबद्दल कोणताही आमदार हा खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत नाही. असे असताना मात्र, आदित्य ठाकरे हे सातत्याने आमच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे गायकवाडांनी सांगितले आहे. असेच सुरु राहिले तर मग आमच्या सहनशीलतेचा अंत होईल असेही ते म्हणाले आहेत. काही बोलण्यासारखे नसले की, आदित्य ठाकरे हे आमच्यावर टीका करतात. पण जनतेला माहिती आहे की, राज्याच्या हितासाठी कोण चांगल ते? असेही गायकवाड यांनी सांगितले आहे.

आदित्य ठाकरेंची टिका गायकवाडांना झोंबली

शिंदे गटाची स्वतंत्र स्थापना झाली असतानाही अजून या गटातील आमदार हे ठाकरे कुटुंबियांबद्दल सावध प्रतिक्रिया देतात. असे असतानाही आदित्य ठाकरे यांच्याकडून टीकेचे बाण हे सुरुच आहेत. हिंदू मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून दंगली घडवण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप आदित्य यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत बैठका घेता मग ही काय हिंदुत्वाची प्रतारणा नाही का ? असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.