शिंदे गटाची धडपड काय जनतेला माहितीय..! हिंदुत्वावरुन अंबादास दानवेंचे काय टीकास्त्र?
दोन दिवसांपूर्वी मंत्री संदीपान भुमरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. शंकरराव गडाख यांना मंत्रीपदे देण्यासाठी किती खोके घेतले असा सवाल त्यांनी थेट पक्षप्रमुखांना दिला होता.
मुंबई : दसरा मेळावा (Dussehra Gathering) आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सुरवातीला पोस्टर्स, टीझर आणि त्यानंतर आता घोषवाक्यावरुनही राजकारण (Politics) पेटत आहे. शिवसेनेपाठोपाठ शिंदे गटानेही आपले घोषवाक्य तयार केले आहे. हिंदू गर्व गर्जना, गर्व से कहो हम हिंदू हैं..! असे ते वाक्य असून यावर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्री अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. काय ती टोपी, काय तो रुमाल आणि काय ती फुसकी गर्जना म्हणून शिंदे गटाला हिणवले आहे. दसरा मेळावा चार दिवसावर आला असताना दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
दोन दिवसांपूर्वी मंत्री संदीपान भुमरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. शंकरराव गडाख यांना मंत्रीपदे देण्यासाठी किती खोके घेतले असा सवाल त्यांनी थेट पक्षप्रमुखांना दिला होता. त्यामुळे शिंदे गटाकडून भुमरे यांना टार्गेट केले जात आहेत.
शिंदे गटाला हिंदूत्व नाहीतर स्वार्थ साधायचा असल्याचे दानवे यांनी म्हणले आहे. हिंदूत्व हे केवळ दर्शनी भाग असून त्यामागे 50 खोक्यांचा विषय असल्याचे दानवे यांनी सूचित केले आहे. शिवाय राज्यात सुरु असलेले सर्वकाही जनतेच्या लक्षात येत असून वेळच याला योग्य उत्तर देईल असा सूर शिवसेनेतून उमटत आहे.
अंबादास दानवे यांनी शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांना टार्गेट केले आहे. सत्तारांची नमाज आणि भुमरेंची टोपी यावरुन त्यांनी टीकास्त्र केले आहे. ही गर्व गर्जना नसून एक फुसकी गर्जना असल्याचे दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.
व्वा रे हिंदू गर्व गर्जना यात्रा! म्हणे, गर्व से काहो हम हिंदू है! काय ती टोपी.. काय तो रुमाल.. काय ती फुसकी गर्जना! व्वा! ओक्के!! असे म्हणत शिंदे गट ऐवजी त्यांनी मिंधे गट असा उल्लेख केला आहे.