Dipak Kesarkar Profile | सावंतवाडीचे नगराध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री, शिंदे गटाची मांडली भरभक्कम बाजू, वाचा शांत, सयंमी दिपक केसरकरांचा राजकीय प्रवास

Cabinet Minister Dipak Kesarkar Profile | शिवसेना बंडखोर गटाची भक्कमपणे बाजू मांडणारे कोकणातील दिपक केसरकर यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडली आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले दिपक केसरकर आहे तरी कोण? वाचा

Dipak Kesarkar Profile | सावंतवाडीचे नगराध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री, शिंदे गटाची मांडली भरभक्कम बाजू, वाचा शांत, सयंमी दिपक केसरकरांचा राजकीय प्रवास
सावंतवाडीला पुन्हा कॅबिनेटImage Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 1:03 PM

Cabinet Minister Dipak Kesarkar Profile | शिवसेना बंडखोर गटाची भक्कमपणे बाजू मांडणारे दिपक केसरकर ( Dipak Kesarkar) त्यांच्या शांत आणि संयमी बोलण्यामुळे लागलीच चर्चेत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाची प्रवक्ते म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या रुपाने कोकणाला कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) मिळाला. सोन्याचा चमचा घेऊन आलेले असले तरी दिपक केसरकरांनी त्यांच्या साधेपणामुळे लोकांची मने जिंकली. उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या महाविकास आघाडीत त्यांनी गृहराज्यमंत्री म्हणून कारभार पाहिला. पण त्यांची कारकिर्द काही शिवसेनेतून सुरु झाली नाही. दीपक केसरकर हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा सधन कुटुंबातून आलेले आहे. सावंतवाडी मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करतात. स्वीकृत नगरसेवक ते कॅबिनेट मंत्रीपद या सर्व राजकीय प्रवासात त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक राजकीय टप्प्यावर त्यांनी यशाला गवसणी घातली.

सावंतवाडीतून राजकीय कारकिर्द सुरु

सावंतवाडी नगरपालिकेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून केसरकर यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते नगराध्यक्ष झाले. आपल्या व्यक्तिमत्वामुळे त्यांनी लोकांची मने जिंकली. सावंतवाडी मतदारसंघातून तीन वेळा निवडून येण्याची हॅट्रिक त्यांनी साधली. सेना-भाजप युती सरकारमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला. सुसंस्कृत राजकीय विचारसरणीचे राजकीय नेते निपजणे आता महाकठिण झाले आहे. आरोप-प्रत्यारोप करणारे, गलिच्छ आरोप करणारे, विखारी टीका आणि शिव्या घालणाऱ्या राजकारणात केसरकर हे कोणाला ही न दुखावण्याची भूमिका सहज घेतात आणि निभावतात, हे बंडाच्या काळात उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी कृतीतून उत्तर दिल्याचे दिसून येते.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचे प्रवक्ते

शिंदे गटाने महाविकास आघाडी आणि शिवसेनेत बंड केल्याने उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आले. शिंदे यांच्या नेतृत्वातील या गटाने अगोदर सुरत आणि नंतर गुवाहाटी येथे मोर्चा वळविला. त्यावेळी शिंदे गटाकडून गटाची ध्येयधोरणे, पुढील वाटचाल, रणनीती इत्यादी बाबी प्रसार माध्यमांपर्यंत पोहचवण्याचे काम केसरकर यांनी केले.

केसरकर यांची राजकीय कारकिर्द

1. काँग्रेसी विचारसरणीचा पुरस्कार करत काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात

2. सावंतवाडी पालिकेतून राजकीय कारकीर्द सुरु

3. काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसलेंशी जवळीक

4. 2009 ची विधानसभा निवडणूक टर्निंग पॉईंट ठरली

5. प्रवीण भोसलेंना शह देत राष्ट्रवादीकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी

6. केसरकरांना आमदार म्हणून निवडून आणण्यात नारायण राणेंची महत्वाची भूमिका

7. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेनेत प्रवेश

8. 2014च्या विधानसभेत शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले

9. 2014 च्या फडणवीस सरकारमध्ये केसरकरांवर गृहराज्यमंत्री पदासह अर्थ व वित्त विभागाची जबाबदारी

10. महाविकास आघाडी स्थापन झाल्याने शिवसेनेवर नाराज होऊन शिंदे गटात सामील

11. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटपदी वर्णी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.