Satara : राज्यात सत्ता स्थापनेचा प्रश्न मिटला, स्थानिक पातळीचा घोळ निराळा..! शिंदे गट-भाजपात निघेल का मधला मार्ग?
शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीनंतर राज्यात सत्तांतर झाले खरे पण स्थानिक पातळीवर जागा वाटप आणि वर्चस्व कुणाचे हे कसे ठरवले जाणार हे महत्वाचे आहे. एकीकडे शिंदे गटातील मंत्री हे एकला चलो रे ची भूमिका घेत आहेत.
दिनकर थोरात Tv9 मराठी प्रतिनिधी, सातारा : राज्यात सत्ता स्थापन करण्यास शिंदे गट आणि भाजपाला यश मिळाले आहे. राजकीय (Politics) नाट्यानंतर अद्यापपर्यंत काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका वगळता इतर कोणत्याही निवडणुका लागलेल्या नाहीत. आगामी काळात नगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायचत समित्यांच्या निवडणुका (Lcal bodies) पार पडणार आहेत. या निवडणुकांना घेऊन शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद (Differences of opinion) असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात भाजप बरोबर युती नको असे सांगितले होते तर आज साताऱ्यात मंत्री शंभुराज देसाई यांनी मात्र, भाजप आणि शिंदे गट एकत्रच निवडुका लढविणार असल्याचे सांगितेले आहे.
शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीनंतर राज्यात सत्तांतर झाले खरे पण स्थानिक पातळीवर जागा वाटप आणि वर्चस्व कुणाचे हे कसे ठरवले जाणार हे महत्वाचे आहे. एकीकडे शिंदे गटातील मंत्री हे एकला चलो रे ची भूमिका घेत आहेत तर दुसरीकडे स्थानिक निवडणुकांमध्येही युती अबाधित राहणार असल्याचे सांगत आहेत.
कृषी अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वी दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. यावेळी आपल्या मतदार संघात भाजप सोबत युती नको असा सूर उमटला होता. मात्र, ही भूमिका केवळ आपल्याच मतदारसंघाबाबत असल्याचे सत्तार यांनी सांगितले होते. राज्यात काय होईल हे मुख्यमंत्री ठरवतील असेही ते म्हणाले आहेत.
एकीकडे स्वतंत्र लढण्याची भाषा केली जात आहे तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी मात्र, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्रच लढवणार असल्याचे सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहणार असा शब्द दिला होता. त्यानुसार निवडणूक कोणतीही असू ती आता एकत्रितच लढवली जाणार आहे. केवळ साताराच नाहीतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढविल्या जाणार असल्याचे देसाई म्हणाले आहेत.