”कहाँ गया रे ओ संजय राऊत?” असं म्हणणारे मंत्री गुलाबराव पाटील संजय राऊत यांच्या सुटकेवर म्हणाले…

संजय राऊत यांना ९ नोव्हेंबर रोजी १०२ दिवसांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला.यानंतर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या सुटकेवर देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

''कहाँ गया रे ओ संजय राऊत?'' असं म्हणणारे मंत्री गुलाबराव पाटील संजय राऊत यांच्या सुटकेवर म्हणाले...
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 9:04 AM

जळगाव : शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या भाषण शैलीसाठी ओळखले जातात, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांनी अनेक वेळा एकमेकांवर टीका केली. मात्र पत्राचाळ कथित घोटाळ्या प्रकरणी जेव्हा संजय राऊत हे तुरुंगात होते, तेव्हा गुलाबराव पाटील यांनी बहुतांश सभेत त्यांच्यावर निशाणा साधला होता. एका सभेत तर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर फिल्मीस्टाईल टीका केली होती. मात्र संजय राऊत यांना ९ नोव्हेंबर रोजी १०२ दिवसांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला.यानंतर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या सुटकेवर देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

याआधी जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी फिल्मी स्टाईलमध्ये बोलताना म्हटलं होतं, “कहाँ गया रे ओ संजय राऊत?, संजय राऊत इज चक्की पिसिंग पिसिंग अॅण्ड पिसिंग”, असा फिल्मी स्टाईल दणका गुलाबराव यांनी हाणला होता.

मात्र संजय राऊत यांच्या सुटकेनंतर आता गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे, त्यांचा नेता तुरुंगातून बाहेर येत आहे, स्वाभाविक आहे त्यांना आनंद होणार आहे.अशी अतिशय मवाळ प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या सुटकेनंतर दिली आहे.

तसेच पुण्याच्या राष्ट्र्वादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी तुमच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे, त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात की, यावर ते ध चा म करण्यात आघाडीवर आहेत, आणि आमची महिला आघाडी यावर रुपाली पाटील यांना उत्तर देणार आहे मी नाही.

गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर जळगाव ग्रामीणमधून निवडून आलेले आमदार आहेत, ते सध्या शिंदे गटात आहेत, तसेच मंत्री आहेत. गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सभा घेतल्या आहेत, त्या सभेत त्यांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.