भिडेंसारखी प्रवृत्ती सत्तारुढ पक्ष जोपासते, जयंत पाटील यांची टीका

मनोहर भिडे यांचे माझे काही संबध नाही. मी कधी त्यांना भेटायला गेलो नाही.

भिडेंसारखी प्रवृत्ती सत्तारुढ पक्ष जोपासते, जयंत पाटील यांची टीका
जयंत पाटील यांची टीका Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 3:51 PM

पुणे : मनोहर भिडे यांचे उद्गार महिलांचा अपमान करणारे आहे. त्याला भारतमातेची पुष्टी जोडणं हे अनाकलनीय आहे. महाराष्ट्रातील सर्व महिला त्याचा निषेध करतील. अशी प्रवृत्ती सत्तारुढ पक्ष जोपासते आहे. हो महाराष्ट्राच्या महिलांनी नोंद घेणं आवश्यक आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. भिडे यांनी महिला पत्रकाराला कुंकू का लावलं नाही, यावरून बाईट देण्यास नकार दिला होता. आधी कपाळाला कुंकू लाव. मग बोलतो, असं ते म्हणाले होते. याला महिलांकडून विरोध होतोय.

मनोहर भिडे यांचे माझे काही संबध नाही. मी कधी त्यांना भेटायला गेलो नाही. माझ्या आईच्या निधनावेळी रक्षा विसर्जनासाठी आले होते. त्यांनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. अशी प्रवृत्ती सरकार जोपासत आहे.

जयतं पाटील म्हणाले, महाराष्ट्रातले सर्व प्रकल्प गुजरातला चाललेत. राज्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ढिम्म बसलेत. राज्यात सुशिक्षित असलेल्या तरुणांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्यात आला असता तर किमान तीन-चार लाख रोजगार आला असता. टाटांना विमान तयार करण्याचा कारखाना तयार करायचं ठरविलं. तीदेखील कंपनी बडोद्याला गेली.

या सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी करण्याचा निर्णय घेतलाय. गुजरातची सेवा करण्याचं काम हे सरकार करत आहे. पोलीस भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. या सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची होती. मात्र त्यातही अडथळे आणले जात आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केलाय.

माहितीच्या अधिकारात सध्या एका दिवसात माहिती मिळते. कारण माहिती मागणाऱ्याने लिहून दिलेलं असतं काय माहिती पाहिजे ती. या सरकारला सिद्ध करायचं आहे की, महाविकास आघाडीपेक्षा आम्ही किती चांगले आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.

या सरकारचा आत्मविश्वास कमी झाला आहे. गुजरात पुढे हे सरकार हतबल झाले आहे. पानभर जाहिरात देण्यापेक्षा फॉक्सकॉनच्या मालकाला जाऊन भेटा. रोजगार आला तर इथल्या तरुणांना काम मिळेल. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय जाहीर करत आहेत, असंही जयंत पाटील म्हणाले.

सरकारची जाहिरात सर्वच पेपरला आहे. जाहिरातदार जर दारात आला तर 5 ते 10 लाखांची जाहिरात घेऊन. मग कुठला पेपरवाला नकार देणार. मात्र सामानाचे पहिले पान उलटल्यानंतर पाहा काय लिहलं आहे ते, असंही त्यांनी सांगितलं.

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....