जागा आणि नाव दोन्ही ठरलं; इथे उभारणार शिंदे गट आपलं शिवसेना भवन

एकनाथ शिंदे दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार अशी देखील चर्चा होती.

जागा आणि नाव दोन्ही ठरलं; इथे उभारणार शिंदे गट आपलं शिवसेना भवन
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 5:11 PM

योगेश बोरसे, tv9, पुणे: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना भवन कुणाचं? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा वाद तर थेट सुप्रीम कोर्टात गेला आहे. मात्र, शिवसेना भवनाचा वाद मिटवण्यासाठी शिंदे आपलं नविन शिवसेना भवन बांधणार आहे. नविन शिवसेना भवनासाठी शिंदे गटाने पुणे शहराची निवड केली आहे.

पुण्यात शिंदे गटाच्या कार्यालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे. सारसबागेसमोरील इमारतीत शिंदे गटाचे नवीन कार्यालय सुरु होणार आहे.

या कार्यालयाला देण्यात येणारे नावही निश्चित करण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना भवन असं या कार्यलयाचं नाव असणार आहे. साधारणपणे 5 हजार चौरस फुटावर हे शिंदे गटाचे कार्यालय असणार आहे. कार्यालयामध्ये मिटिंग हॉल, पत्रकार परिषद हॉल, जनता दरबार हॉलचे नियोजन करण्यात आलं आहे.

सध्या या कार्यालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून दिवाळी पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन केलं जाणार असल्याची माहिती शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिली. एकनाथ शिंदे दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार अशी देखील चर्चा होती.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.