Ramdas Kadam Video : …आणि रामदास कदम ढसाढसा रडले! म्हणाले, 50 वर्षात उभं केलेलं पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळलं

गेल्या 50 वर्षात शिवसेना पक्षासाठी आपले योगदान राहिलेले आहे. पक्ष संघटनेपासून सर्व कामे केली आहेत. शिवसेना पक्ष उभरणीसाठी दिलेले योगदान आणि आताची झालेली अवस्था ही पाहवत नाही. उतरत्या वयाकडे जात असताना पक्षाच्या वाटेला अशा काळोख येईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते पण ते आता प्रत्यक्ष पहावे लागत आहे.

Ramdas Kadam Video : ...आणि रामदास कदम ढसाढसा रडले! म्हणाले, 50 वर्षात उभं केलेलं पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळलं
रामदास कदम
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 12:05 PM

मुंबई : (Balasaheb Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांचा एक कडवट शिवसैनिक म्हणून रामदास कदम यांची ओळख होती. शिवाय त्यांनीच (Shiv Sena) शिवसेना नेतेपदी त्यांची नियुक्तीही केली होती. मात्र, त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेत आपण समाधानी नसल्याचे (Ramdas Kadam) रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्याभरात पक्षाची जी अवस्था झाली आहे ती पाहवत नाही तर जे 50 वर्षामध्ये उभं केलं ते आता पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळत असल्याने आपल्याला रात्र-रात्र झोपही येत नाही. पक्षाची झालेली अवस्था सांगताना रामदास कदम हे भावनिक झाले होते. तर भविष्यातही एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी कायम प्रयत्न राहणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक हीच ओळख

रामदास कदम यांनी सोमवारी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे शिंदे गटाकडून त्यांची याच पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आता नेमकी रामदास कदम यांची ओळख काय म्हणून असणार असा प्रश्न त्यांना करण्यात आला होता. मात्र, आपण बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक होतो आणि भविष्यातही राहणार. शिवाय त्यांनीच मला हे पदही दिले होते. त्यामुळे माझी ओळख ही बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या राजकीय परस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागत असला तरी आपण आगोदर शिवसैनिक आणि नंतर सर्वकाही अशीही प्रतिक्रिया कदमांनी शिवसेना पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरही दिली आहे.

जे स्वप्नात नव्हते ते प्रत्यक्षात घडतयं

गेल्या 50 वर्षात शिवसेना पक्षासाठी आपले योगदान राहिलेले आहे. पक्ष संघटनेपासून सर्व कामे केली आहेत. शिवसेना पक्ष उभरणीसाठी दिलेले योगदान आणि आताची झालेली अवस्था ही पाहवत नाही. उतरत्या वयाकडे जात असताना पक्षाच्या वाटेला अशा काळोख येईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते पण ते आता प्रत्यक्ष पहावे लागत आहे. पदाचा राजीनामा देऊन देखील आपण आनंदी, समाधानी नाही, पण ही वेळ का यावी..? याचा विचार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचार करणे गरजेचे आहे असे म्हणत असतनाच कदम यांचे डोळे पाणावले होते.

50 वर्ष काम अन् हकालपट्टी

ज्या पक्षासाठी आपण 52 वर्ष योगदान दिले त्या पक्षातून हकालपट्टी हे शोभत नाही. स्थानिक पातळीवर आमच्या पदाधिकाऱ्यांनी काम केल्यामुळेच हे पद आपणाला मिळाले असा मु्द्दाही रामदास कदम यांनी उपस्थित केला. सगळं उभा करुन अशा प्रकारे हकालपट्टी होत असेल तर हे वेदनादायी आहे. हे केवळ महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाल्यामुळे परस्थिती ओढावली आहे. शिवाय राष्ट्रवादी सोबत नको असेही आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याचे कदमांनी स्पष्ट केले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.