Naresh Mhaske : ठाण्यात सुसंस्कृतपणा कायमच, राष्ट्रवादीचे काय? शरद पवारांच्या वक्तव्यावर म्हस्केंचे टीकास्त्र..!

ठाणेकरांनी नेहमी सुस्कृंत नेतृ्त्वालाच संधी दिली आहे. मात्र, काहींना त्यांचा विचार केला नाही असे म्हणत म्हस्केंनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे ज्या नेत्यावर एवढी वर्षे ठाणेकरांनी विश्वास दाखवला तो नेतां आज राज्याचे नेतृत्व करत आहे. केवळ ठाणेकरच नाहीतर राज्यातील जनता आता त्यांचे हात बळकट करीत आहे.

Naresh Mhaske : ठाण्यात सुसंस्कृतपणा कायमच, राष्ट्रवादीचे काय? शरद पवारांच्या वक्तव्यावर म्हस्केंचे टीकास्त्र..!
नरेश म्हस्के
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 7:51 PM

ठाणे : (Sharad Pawar) शरद पवार यांनी आज केंद्राने दिलेली आश्वासने आणि पूर्तता याचे वास्तव मांडले. केवळ आश्वासनांची खैरात केली जात आहे प्रत्यक्षात कोणतेही काम पुर्णत्वास नेले गेले नाही असा आरोप करीत त्यांनी राज्य सरकारलाही लक्ष केले. शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाण्यात पक्ष विस्तार आणि जनेतेची अहोरात्र कामे ही जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचे सांगितले आता. आता त्यापद्धतीने कामे तर होतच नाहीत पण ती संस्कृतीही केंद्राची आणि राज्याची नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याला शिंदे गटाचे (Naresh Mhaske) नरेश म्हस्के यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. (Thane) ठाण्याने नेहमीच सुसंस्कृत नेतुत्व दिले आहे. परंतु, पवार साहेब बहुतेक सुसंस्कृत नेत्यांची व्याख्या आता बदललेली दिसते.असे म्हणत म्हस्के यांनी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचे दाखले दिले आहेत. गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवणे आणि त्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे हे त्यांच्या लेखी सुसंस्कृत पणाचे लक्षण असेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ठाणेकर सुसंस्कृतच, पण पक्षातील नेत्यांचे काय?

ठाणेकरांनी नेहमी सुस्कृंत नेतृ्त्वालाच संधी दिली आहे. मात्र, काहींना त्यांचा विचार केला नाही असे म्हणत म्हस्केंनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे ज्या नेत्यावर एवढी वर्षे ठाणेकरांनी विश्वास दाखवला तो नेता आज राज्याचे नेतृत्व करत आहे. केवळ ठाणेकरच नाहीतर राज्यातील जनता आता त्यांचे हात बळकट करीत आहे. सुसंस्कृतपणा ठाणेकर आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आहे पण आपल्या पक्षातील नेत्यांचे काय? एक कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवणे आणि त्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे हे सुस्कंतपणाचे आहे की, गृहमंत्री पद मिळाल्यानंतर डान्स बार मालकांकडून खोक्याने पैसा गोळा करण्यात सुसंस्कृतपणा आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आता कर्तव्यदक्षता आणि सुसंस्कृतपणाही

ज्या सुज्ञ ठाणेकरांनी एवढी वर्ष एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला तेच आता राज्याचे नेतृत्व करीत आहेत. अल्पावधीतच हे सरकार सर्वसामान्यांनाही आपलसं वाटू लागलेले आहे. त्यामुळे शिंदे यांनी केवळ सुसंस्कृतपणाचेच दर्शन घडवून आणले नाहीतर ते किती कर्तव्यदक्ष आहेत. त्याचा प्रत्यय येऊ लागल्याचे म्हस्के यांनी सांगितले आहे. त्यामुळे सुसंस्कृतपणावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली होती. त्याला नरेश म्हस्के यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

काळीमा पुसण्याचे कामही मुख्यमंत्र्यांकडून

केवळ विकास कामांचाच धडाका नाहीतर ज्यांच्याकडून राजकारणाला आणि समाजकारणाला काळीमा फासण्याचा प्रयत्न झाला तो देखील पुसण्याचा प्रयत्न आता मुख्यमंत्री करीत आहेत. शिवाय ते ठाणेकर असल्याचा आपल्याला अभिमान आहे असे म्हणत शरद पवारांनी केलेले आरोप नरेश म्हस्के यांनी खोडून काढले आहेत. तर ठाण्यात आणि येथील नेतृत्वामध्ये सुसंस्कृतपणा आहे पण आपल्या पक्षात काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.