Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल; राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे भाकीत
सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या खंडपीठाचे कामकाज सुरू होईल. त्यातून या सगळ्याचा उलगडा होईल. त्याला काही काळ लागेल, मात्र देर है अंधेर नही, असे जे म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल. हा निकाल लागल्यावर पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल असे जयंत पाटील म्हणाले.
मुंबई : एकनाथ शिंदे 40 पेक्षा अधिक पाठिंबा मिळवत बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडी(Maha Vikas Aghadi) सरकार कोसळले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यांनतर विधानसभा अध्यक्षपद निवडणूकीत यापुढचा अध्याय पहायला मिळाला. शिवसेनेच्या आमदारांनी व्हीप झुगारून मतदान केले. महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाल्यानंतर हा सर्व वाद आता सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. यावरुन एकनाथ शिंदे बंडखोर गटातील आमदार तसेच भाजप नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. बंडखोर गटातील आमदारांकडून राष्ट्रवादीवरही गंभीर आरोप केले जात आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री होतील असे भाकीत जयंत पाटील(Jayant Patil) यांनी केले आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीप झुगारून मतदान केले आहे. आता सुप्रीम कोर्टात या सगळ्याचा निवाडा करण्यासाठी खंडपीठ नेमले जाणार आहे. येत्या तीन-चार महिन्यांमध्ये या सगळ्याचा निकाल लागेल. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची वेळ येईल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केले यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देईल
शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केलेले आहे. सुप्रीम कोर्ट याबाबत निर्णय देईल. त्यासाठी खंडपीठाची नेमणूक हीच सुप्रीम कोर्टाची कृती अतिशय गंभीर आहे. विधीमंडळात जे काम झाले आहे, ते सुप्रीम कोर्टाने अतिशय गांभीर्याने घेतले आहे, हा त्याचा संदेश असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या खंडपीठाचे कामकाज सुरू होईल. त्यातून या सगळ्याचा उलगडा होईल. त्याला काही काळ लागेल, मात्र देर है अंधेर नही, असे जे म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल. हा निकाल लागल्यावर पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल असे जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रपती निवडणुकीबाबत शिवसेनेने जाहीर केलेल्या भूमिकेचे राष्ट्रवादीकडून समर्थन
राष्ट्रपती निवडणुकीबाबत शिवसेनेने जाहीर केलेल्या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले आहे. त्यांना जो उमेदवार योग्य वाटतो, त्यांना त्यांनी पाठींबा दिलेला आहे. यापुर्वी प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठींबा दिला होता. महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांनाही शिवसेनेने पाठींबा दिल्याचे जयंत पाटील म्हणाले.