Rajya Sabha Election : AMIM च्या मतासाठी शिवसेनेचा कानामागून घास; हिंदुत्वासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची ढाल, काय आहे गणित?

AMIM ची ही दोन मते आल्यास मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. तर AMIM ची दोन मते आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटलं होतं.

Rajya Sabha Election : AMIM च्या मतासाठी शिवसेनेचा कानामागून घास; हिंदुत्वासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची ढाल, काय आहे गणित?
महाविकास आघाडीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 5:26 PM

मुंबई : राज्यसभा निवडणूकीवरून (Rajya Sabha Election) राजकीय पक्षांमध्ये ओढाताण दिसत आहे. राज्यातील 6 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या निवडणूका होत आहेत. तर 10 जून रोजी मतदान पार पडेल. तर आता मतदानाला फक्त काहीच तास उरले आहेत. त्यामुळे आता त्या घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा जोमाने तयारी सुरू केली आहे. तसेच महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार हा निवडूण यावा यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. तर राज्यात एमआयएम (AMIM) चे दोन आमदार असून त्यांचे मत कसं आपल्या पारड्यात पडेल यासाठी भाजपसह महाविकास आघडीचे नेते करत आहेत. यादरम्यान आता AMIM ची दोन मते ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यावीत अशी रणनिती आखल्याचे समोर येत आहे.

AMIM ची दोन मतं

राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 42 मतांची गरज असते. तर भाजपकडे सध्या 113 आमदारांचं संख्याबळ आहे त्यात भाजपचे 106, रासप 1, जनसुराज्य 1 आणि 5 अपक्षांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार आहेत. या संख्याबळानुसार भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल. तर सहाव्या जागेसाठी काटेकी टक्कर पहायला मिळत आहे. त्यासाठी AMIM ची दोन मते ही आपल्याकडे घेण्यासाठी भाजपसह महाविकास आघडी सरकारमधील मित्र पक्ष धडपडताना दिसत आहेत. याच्याआधी AMIM ची ही दोन मते आल्यास मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. तर AMIM ची दोन मते आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटलं होतं.

शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावरून अडचणीत येणार नाही

त्यानंतर आता ही मते राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यावीत महाविकास आघाडीकडून ठरवले जात आहे. तर यासाठी पाठिंबा मागणीचे पत्र काँग्रेस NCPच्या सह्यानी काढावे असे म्हटले जात आहे. ज्यात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि NCPचे जयंत पाटील असतील. मात्र त्या पत्रात शिवसेना नसेल असे सांगण्यात येत आहे.कारण मागील काही दिवसांपासून शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यावरून अडचणीत आणले जात आहे. तर AMIM ची दोन मते ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली तर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावरून अडचणीत येणार नाही.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस NCP ने शिवसेनेला मदत करावी

AMIM ची दोन मते ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यावीत. तसेच AMIM च्या मतांच्या बदल्यात काँग्रेस NCPने आपली प्रत्येकी एक एक मत शिवसेनेला द्यावे अशी व्यूहरचना केल्याचे समजत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.