Rajasthan Election 2023 : लग्नपत्रिकेखाली छापलेले मतदानाचे अनोखे निमंत्रण पत्र होतेय व्हायरल, निवडणूक अधिकाऱ्यांचा असाही कारनामा
जोधपूर जिल्हा प्रशासनाने या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी सरदारपुरा, जोधपूर शहर, सूरसागर, लुनी, ओसियन, लोहावत आणि फलोदी यासह अनेक विधानसभा मतदारसंघातील मतदारांना लग्नाच्या निमंत्रण पत्रिकांसारखी कार्डे देण्यात आलीय.
जोधपुर | 23 नोव्हेंबर 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राजस्थान विधानसभेच्या 200 जागांसाठी 25 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रत्येक उमेदवार आपापला मतदारसंघ ढवळून काढत आहेत. अशातच राजस्थानमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने अनोखी शक्कल लढविलीय. हुबेहूब लग्न पत्रिका वाटावी असे खास निमंत्रण पत्र बनविले आहे. हे कार्ड सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
राजस्थानमध्ये जिल्हा प्रशासनाने मतदारांमध्ये मतदानाची जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी खास निमंत्रण पत्रिका छापली आहे. ही निमंत्रण पत्रिका हुबेहूब लग्न पत्रिकेसारखी दिसत आहे. ही लग्न पत्रिका सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ही पत्रिका व्हायरल झाल्यानंतर निमंत्रण पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला विशेष दिवस साजरा करण्यासाठी राज्यातील लोक उत्सुक असल्याचे दिसून आलेय.
जोधपूर जिल्हा प्रशासनाने या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी सरदारपुरा, जोधपूर शहर, सूरसागर, लुनी, ओसियन, लोहावत आणि फलोदी यासह अनेक विधानसभा मतदारसंघातील मतदारांना लग्नाच्या निमंत्रण पत्रिकांसारखी कार्डे देऊन मतदानासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे.
मतदान दिवस पर अवश्य मत का प्रयोग भय मुक्त और निष्पक्ष रूप से करें l जोधपुर ग्रामीण पुलिस सदैव आपके साथ l@amanjaisal@Igp_Jodhpur pic.twitter.com/FI8bV3LPXd
— Jodhpur Rural Police (@JdprRuralPolice) November 8, 2023
जोधपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या निमंत्रण पत्रामधून जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे. हिंदी भाषेत ही निमंत्रण पत्रिका आहे. यामध्ये ‘भेज रहे है निमंत्रण, तुम्हे बुलाने को, 25 नवंबर भूल न जाना, वोट डालने आने को’ अशा आशयाची ओळ या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आली आहे. या निमंत्रण पत्रिकेमध्ये कार्यक्रमाच्या माहितीमध्ये शनिवार 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ असेल आणि मतदानाचे ठिकाण स्वतःचे मतदान केंद्र असेल, असे सांगण्यात आले आहे.
यासोबतच या पत्रिकेमध्ये मतदारांना विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळवण्यासाठी कार्डमध्ये KYC अॅपची माहितीही देण्यात आली आहे. तुमच्या भागातील उमेदवारांची माहिती मिळवण्यासाठी केवायसी अॅप डाउनलोड करा, असेही या निमंत्रण पत्रात सांगण्यात आले आहे. तसेच, दुसरीकडे, मतदारांना मतदान केंद्राच्या माहितीसाठी व्होटर हेल्पलाइन अॅपचीही माहितीही यामध्ये देण्यात आली आहे. तर सर्वात शेवटी ‘हमारे विधानसभा चुनाव में, मतदान करने जरूर पाधारना’ असे आवाहनही करण्यात आलंय.