‘हिंदू’ ही इंग्रजांनी दिलेली उपाधी : कमल हसन

चेन्नई : “हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात आढळत नाही. हा शब्द मोगल किंवा परकीय आक्रमकांनी आपल्याला दिला आहे. त्यामुळे ‘हिंदू’ हा शब्द वापरण्याऐवजी आपण स्वत:ला ‘भारतीय’ म्हटंल पाहिजे, असे वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी “स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचं नाव […]

'हिंदू' ही इंग्रजांनी दिलेली उपाधी : कमल हसन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

चेन्नई : “हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात आढळत नाही. हा शब्द मोगल किंवा परकीय आक्रमकांनी आपल्याला दिला आहे. त्यामुळे ‘हिंदू’ हा शब्द वापरण्याऐवजी आपण स्वत:ला ‘भारतीय’ म्हटंल पाहिजे, असे वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी “स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली.” असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसनने यांनी केले होते. त्यानंतर कमल हसन यांच्या या नव्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कमल हसन यांनी ट्विटरवर तामिळ भाषेत ट्विट करत हे वक्तव्य केलं आहे. कोणत्याही प्राचीन ग्रंथामध्ये ‘हिंदू’ हा शब्द आढळत नाही. मोगल किंवा परकीय आक्रमकांनी आपल्याला हा शब्द दिला आहे. त्यामुळे ‘हिंदू’ या शब्दाला कोणत्याही धर्माशी जोडणं चुकीचं आहे. त्यामुळे आपण आपली खरी ओळख ‘हिंदू’ म्हणून न करता, ‘भारतीय’ म्हणून केली पाहिजे, असं कमल हसन यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच अलवर ते नयनमार आणि शैव ते वैष्णवांनीही कधीही ‘हिंदू’ या शब्दाचा वापर केलेला नाही.  त्याशिवाय कोणत्याही प्राचीन धर्म ग्रंथात ‘हिंदू’ या शब्दाचा साधा उल्लेखही आढळत नाही. त्यामुळे हा शब्द ब्रिटिशांच्या राजवटीत प्रचलित झाला आहे आणि आजतागायत आपण हा शब्द पुढे नेण्याचे काम करत आहोत, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याआधीही अभिनय क्षेत्रातून राजकीय आखाड्यात उतरलेल्या कमल हसनने तामिळनाडूतील अरावकुरीची इथं प्रचारसभेत बोलताना “स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली”, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “हा मुस्लिमबहुल परिसर आहे म्हणून मी हे वक्तव्य करतोय असं नाही, तर माझ्यासमोर गांधींची प्रतिमा आहे. मी यांच्या हत्येचं उत्तर शोधण्यासाठी आलो आहे”, असेही ते म्हणाले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या.

संबंधित बातम्या : 

नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी : कमल हसन

कमल हसनला गांधींजींकडे पाठवण्याची तयारी झाली : हिंदू महासभा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.