PHOTO: देशाच्या सर्वात तरुण महापौर Arya Rajendra आणि केरळचे आमदार सचिन देव यांचा साखरपुडा, अत्यंत साधा सोहळा
तिरुअनंतपुरनम् | देशातील सर्वात तरुण महापौर आर्या राजेंद्र (Arya Rajendra) आणि केरळमधील सर्वात तरुण आमदार सचिन देव (Sachin Dev) यांचा साखरपुडा रविवारी पार पडला. अत्यंत साधेपणाने हा सोहळा झाला. केरळमधील सत्ताधारी पक्षाच्या मुख्यालयात या जोडप्यानं एकमेकांच्या हातात अंगठी घातली. यावेळी क्यमुनिस्ट पार्टी (CPIM) या पक्षातील अनेक वरिष्ठ नेते तसेच आर्या राजेंद्र व सचिन देव यांचे […]
तिरुअनंतपुरनम् | देशातील सर्वात तरुण महापौर आर्या राजेंद्र (Arya Rajendra) आणि केरळमधील सर्वात तरुण आमदार सचिन देव (Sachin Dev) यांचा साखरपुडा रविवारी पार पडला. अत्यंत साधेपणाने हा सोहळा झाला. केरळमधील सत्ताधारी पक्षाच्या मुख्यालयात या जोडप्यानं एकमेकांच्या हातात अंगठी घातली. यावेळी क्यमुनिस्ट पार्टी (CPIM) या पक्षातील अनेक वरिष्ठ नेते तसेच आर्या राजेंद्र व सचिन देव यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवराची उपस्थिती होती. आर्या यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच महापौर पदाचा कारभार पाहण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून त्या चर्चेत आल्या होत्या. तर सचिन देव हेदेखील
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे काम करत असताना बालासंघम या ठिकाणी दोघांची ओळख झाली. हे दोघेही तेव्हा बालासंघम येथील चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. सध्या सचिन देव हे कोझिकोडे जिल्हा समिती आणि एसएफआय चे राज्य सचिव आहेत.
दरम्यान, आर्या या छाला परिसरातील कम्युनिस्ट पार्टीच्या समिती सदस्य असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य समिती सदस्य आहेत. आर्या राजेंद्र यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच डिसेंबर 2020 मध्ये तिरुअनंतपुरम महापालिकेच्या महापौर पदाचा कारभार हाती घेतला असून देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून त्या चर्चेत आल्या होत्या. गेल्या महिन्यात या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आर्या आणि सचिन यांचा साखरपुडा झाला असून पुढील महिन्यात ते विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या-