Politics : तर आणि तरच मोदी यांना पर्याय उभा राहू शकतो…! राजकीय विश्लेषकांचे म्हणणे तरी काय?

देशभरात भाजपाचा विस्तार आणि मोदींचे नेतृ्त्व याला एकच कारण ठरले आहे ते म्हणजे सक्षम विरोधकच मिळालेला नाही. प्रादेशिक पक्ष स्थानिक पातळीवरच अडकून राहिले आहेत. तर कॉंग्रेसला आपली होत असलेली वाताहात रोखता आलेली नाही. त्यामुळे विरोधकांना रोखण्यासाठी लावावे लागणारे बळ हे भाजपाला कधी करावेच लागले नाही.

Politics : तर आणि तरच मोदी यांना पर्याय उभा राहू शकतो...! राजकीय विश्लेषकांचे म्हणणे तरी काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 9:37 PM

पुणे :  (Politics) राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, हे जरी खरे असले तरी गेल्या दहा वर्षापासून (Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा हा कायम आहे. पाच वर्षांनंतर 2019 साली झालेल्या निवडणूकांमध्ये मोदी लाट ओसरेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण झाले ते उलटेच. आता 2024 च्या निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. जर  (BJP Party) मोदी आणि भाजपाला रोखून एक सक्षम पर्याय उभा करायचा असेल तर देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येणेच हाच पर्याय आहे. शिवाय हे काम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडूनच होईल असा अंदाज राजकीय विश्लेषक संजय आवटे यांनी व्यक्त केले आहे. शिवाय या अनुशंगाने विरोधक यापूर्वीही राष्ट्रपती निवडणूकीच्या दरम्यान एकवटले होते. पण आतापासून या संदर्भात गांभीर्यांने विचार झाले तरच मोदींना पर्याय उभा राहू शकतो असेही आवटे हे म्हणाले आहेत.

कॉंग्रेसने संधी गमावली

देशभर जाळे असणाऱ्या कॉंग्रेसला भाजपाला विरोध करणे हे सहज शक्य होते. पण पक्षाला होत असलेली वाताहात ही रोखता आली नाही. त्यामुळे आज नेतृत्वाचा प्रश्न हा कायम आहे. सध्या पक्षात होत असलेल्या घडामोडीवरुन कॉंग्रेसला विरोधी पक्षाचे नेतृत्वही पेलणे अवघड होत आहे. पक्षाने वेळेनुसार बदल केले नाहीत आणि आव्हानाला सामोरे न जात त्यापासून दूर राहणेच पसंत केल्याने ही वेळ आल्याचे आवटे यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवरांमध्येच ती क्षमता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सक्षम पर्याय उभा करायचा असेल तर मात्र, विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यामध्ये देशभरातील प्रमुख नेत्यांना एकाच छताखाली आणण्यासाठी शरद पवार हेच योग्य राहतील असे संजय आवटे यांनी सांगितले आहे. शरद पवार यांचे सर्वच पक्षातील प्रमुखांशी संबंध आहेत. शिवाय त्यांनी नेतृत्व केले तर कुणाचा विरोधही होणार नाही. राष्ट्रीय स्तरावरील सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याची क्षमता त्यांच्यामध्येचे असल्याचे आवटे यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या 10 वर्षात सक्षम विरोधकच नाही

देशभरात भाजपाचा विस्तार आणि मोदींचे नेतृ्त्व याला एकच कारण ठरले आहे ते म्हणजे सक्षम विरोधकच मिळालेला नाही. प्रादेशिक पक्ष स्थानिक पातळीवरच अडकून राहिले आहेत. तर कॉंग्रेसला आपली होत असलेली वाताहात रोखता आलेली नाही. त्यामुळे विरोधकांना रोखण्यासाठी लावावे लागणारे बळ हे भाजपाला कधी करावेच लागले नाही. त्यामुळे गेल्या 10 वर्षात झाले नाही ते आगामी निवडणूकांमध्ये होईल पण त्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

यांची राहिल महत्वाची भूमिका

देशभरातील सर्व विरोधक एकवटायचे असतील तर हे काम शरद पवार हेच करु शकणार आहेत. त्यांच्या माध्यमातून नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, ठाकरे आणि काही विरोधी पक्षही एकत्र येतील असा विश्वास संजय आवटे यांनी व्यक्त केला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.