Jagdeep Dhankhar : धनखर यांना उपराष्ट्रपतीपदाची संधी देऊन भाजपाने एकाच दगडात तीन पक्षी मारले; ते कसे जाणून घ्या
जगदीप धनखर यांना भाजपाने (BJP) आपला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषीत केले आहे. भाजपाने यामधून एकाच दगडात तीन पक्षी मारल्याची चर्चा आहे.
नवी दिल्ली : जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) हा एकेकाळी राजस्थानच्या राजकारणातील प्रसिद्ध चेहरा होता. ते सध्या पश्चिम बंगालचे (West Bengal) राज्यपाल आहेत. जगदीप धनखर यांना भाजपाने (BJP) आपला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषीत केले आहे. भाजपाने यामधून एकाच दगडात तीन पक्षी मारल्याची चर्चा आहे.जगदीप धनखर यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.त्यानंतर भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जगदीप धनखर यांच्या नावाची घोषणा केली. धनखर यांनी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नावाची घोषणा होताच पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या निर्णयाची माहिती देताना नड्डा म्हणाले की भाजपाचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार्लमेंटरी बोर्डाची बैठक पार पडली. या बैठीकीमध्ये अनेक नावांवर चर्चा झाली.मात्र त्या सर्वांमधून अखेर जगदीप धनखर यांचं नाव निश्चित करण्यात आलं.
ओबीसी नेतृत्व
पुढे बोलताना जे.पी नड्डा यांनी म्हटले आहे की, आम्हाला हे सांगताना आनंद होतो की, आम्ही एका शेतकरी मुलाला उपराष्ट्रपती पदासाठी संधी दिली. जर धनखर हे विजयी झाले तर ती ओबीसी समजासाठी मोठी संधी असेल. या निमित्ताने ओबीसी समजाला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रसह अनेक राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तापत आहे. जगदीप धनखर यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड करून भाजपाने हेच दाखवून दिले आहे की, आम्ही ओबीसींच्या बाजून आहोत.या निवडीने योग्य तो संदेश समाजात जाण्यास मदत होणार आहे.
राजस्थान विधानसभेची निवडणूक
त्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी देखील एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की,जगदीप धनखर हे आमचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील ही अभिमानाची बाब आहे. जगदीप धनखर यांनी नेहमीच शेतकरी, तरुण,महिला आणि उपेक्षित घटकांसाठी काम केले आहे.यातून भाजपाला हे दाखवण्याची संधी आहे की ते कसे सर्वसामान्य व्यक्तीला मोठ्या पदावर पोहोचण्याची संधी देतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुढील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कधी काळी धनखर हे राजस्थानच्या राजकारणाचा प्रसिद्ध चेहरा होते. जगदीप धनखर हे जाट समाजातील नेतृत्व आहे. जाट समाजाला आरक्षण मिळवून देण्यात देखील त्यांचे महत्त्वाचे योगदान होते, या सर्व गोष्टी राजस्थानमध्ये भाजपाच्या पथ्यावर पडू शकतात.