Uddhav Thackeray : इकडे आड, तिकडे विहिर, उद्धव ठाकरेंसमोर धर्मसंकट, एका स्टोरीचे हे 3 अँगल समजून घ्या

या बंडाची सुरवात ज्या एकनाथ शिंदेंनी सुरु केली ते अजूनही आपल्या मुद्यांवर ठाम आहेत. यापुढे हिंदुत्वाला घेऊनच पक्षाची वाटचाल ही झाली पाहिजे शिवाय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या बरोबर सत्ता नको. या पक्षामुळेचे शिवसेनेचे नुकसान झाले असून यामुळे आमदारांमध्ये नाराजीचा सूरही आहे.

Uddhav Thackeray : इकडे आड, तिकडे विहिर, उद्धव ठाकरेंसमोर धर्मसंकट, एका स्टोरीचे हे 3 अँगल समजून घ्या
मुख्यमंत्री, उध्दव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 5:32 PM

मुंबई : ‘संकटे आली की ती चोहीबाजूने’ येतात आणि येताना सर्वांना घेऊनच येतात अशी काहीशी अवस्था (Maharashtra CM) राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख (Udhav Thakeray) उध्दव ठाकरे यांची झाली आहे. गेल्या तीन दिवसांतील घडामोडी पाहता त्यांच्या आणि पक्षाच्या (Politics) राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षावरच आता इतर आपला हक्क सांगू लागले आहेत. या सर्व परस्थितीमध्ये मात्र, उध्दव ठाकरे यांची कोंडी होऊ लागली आहे. सध्याच्या परस्थितीमध्ये असा एकही मार्ग नाही ज्यामधून पक्ष प्रमुख यांची सूटका होईल. धर्मसंकटात सध्या पक्ष प्रमुख असून इकडे आड, तिकडे विहिर अशीच काहीशी अवस्था झाली आहे. बंडखोरांमध्ये आतापर्यंत आमदारांची संख्या वाढत होती आता खासदारांचीही भर पडते की अशी स्थिती झाली आहे. शिवसेनेकडे एकनिष्ठ असे केवळ 13 आमदार राहिले आहेत. तर शिंदे यांच्या गटाकडे आमदारांची संख्या ही वाढतच आहे. त्यामुळे बंडखोर आमदार झुकायला तयार नाहीत शिवाय भाजपसोबत पुन्हा सूत जुळणे एवढे सहज राहिले नाही तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला कसे सोडावे यातून मुख्यमंत्री नेमका काय पर्याय काढतात हे पहावे लागणार आहे.

  1. एकनाथ शिंदे झुकायला तयार नाहीत या बंडाची सुरवात ज्या एकनाथ शिंदेंनी सुरु केली ते अजूनही आपल्या मुद्यांवर ठाम आहेत. यापुढे हिंदुत्वाला घेऊनच पक्षाची वाटचाल ही झाली पाहिजे शिवाय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या बरोबर सत्ता नको. या पक्षामुळेचे शिवसेनेचे नुकसान झाले असून यामुळे आमदारांमध्ये नाराजीचा सूरही आहे. त्यामुळे हिंदुत्व आणि या दोन पक्षाला सोडून जो कोणता निर्णय असेल तो मान्य असे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. या मुद्यांवरुन बाजूला हटण्यास एकनाथ शिंदे हे तयार नसल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची अडचण अधिक वाढली आहे.
  2. भाजपसोबत जाऊ शकत नाहीत भलेही शिवसेना आणि भाजपा यांची 25 वर्षाची युती राहिली असली तरी गेल्या अडीच वर्षाच्या काळात पूलाखालून एवढे पाणी गेले आहे की ते संबंध आता पूर्वीसारखे होणार नाहीत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ताणले गेलेले संबंध हे अडीच वर्षात तुटले आहेत. शिवाय राजकीय मतभेद बाजूला केले तरी वैयक्तिक पातळीवर सेना आणि भाजप अनेक वेळा रिंगणातही उतलेली आहे. मित्रपक्ष, घातपात, दगाफटका यामुळे उध्दव ठाकरे हे धड आता भाजपसोबतही जातील असे चित्र नाही. जिथे पक्षाची नाच्चकी होणार तोच मुद्दा आता बंडखोर आमदारांनी प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे हे सध्याच्या स्थितीमध्ये भाजपासोबतही जाऊ शकत नाहीत.
  3. काँग्रेस – राष्ट्रवादीला सोडावे कसे? राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे विरोधक हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे राहिलेले होते. पक्षाच्या स्थापनेपासून ते 2019 च्या निवडणुकीपर्यंत हे मतभेद कायम होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत निर्माण झालेल्या अभूतपूर्व परस्थितीमुळे राजकारणातील पक्के वैरी हेच मित्रपक्ष झालेले सर्व राज्याने पाहिले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या अनपेक्षित युतीमुळे मुख्यमंत्रीपद हे सेनेला मिळाले एवढेच नाहीतर या पदी दस्तुरखुद्द उध्दव ठाकरे विराजमान झाले होते. हे सर्व घडवून आणण्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका महत्वाची ठरली होती. त्यामुळे आता या कठीण प्रसंगी उध्दव ठाकरे हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सोडून भाजपा बरोबरही जाऊ शकत नाहीत. त्यामुळे इकडे विहिर, तिकडे आड अशी त्यांची स्थिती झाली आहे.
  4. काय निर्णय घेणार मुख्यमंत्री ? चोहीबाजूने कोंडी झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवाय त्यांनी केलेल्या फेसबुक लाईव्ह वरुन आपल्याला पदाची अपेक्षा नाही म्हणत एक प्रकारे भावनिक सादच बंडखोर आमदारांना घातेलेली आहे. पक्षातीलच लोक नाराज आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीची साथ असा पेच त्यांच्यापुढे असल्याने नेमका ते काय निर्णय घेणार? नाराजांना स्वगृही घेण्यासाठी इतर पक्षांची साथ सोडणार का हे पहावे लागणार आहे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.