विकासावर बोलायला जागा नाही, विरोधकांकडून जातीचं विष पेरलं जातंय : पंकजा मुंडे

बीड : लोकसभेच्या रिंगणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. बीडमध्येही मुंडे बहीण-भावांमध्ये हाच प्रकार सुरु आहे. पण विरोधकांकडे विकासावर बोलण्यासाठी काहीही नसल्यामुळे आता जातीचं विष पेरलं जातंय, अशी खंत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन विरोधक समाजामध्ये जातीभेदाचे विष पेरण्याचे पाप करीत आहेत. मात्र आता जातीपेक्षा देशहिताला प्राधान्य देण्याची गरज आहे. […]

विकासावर बोलायला जागा नाही, विरोधकांकडून जातीचं विष पेरलं जातंय : पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

बीड : लोकसभेच्या रिंगणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. बीडमध्येही मुंडे बहीण-भावांमध्ये हाच प्रकार सुरु आहे. पण विरोधकांकडे विकासावर बोलण्यासाठी काहीही नसल्यामुळे आता जातीचं विष पेरलं जातंय, अशी खंत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन विरोधक समाजामध्ये जातीभेदाचे विष पेरण्याचे पाप करीत आहेत. मात्र आता जातीपेक्षा देशहिताला प्राधान्य देण्याची गरज आहे. सामान्य माणसालाही नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते. म्हणून आपणही कोणत्याही चुकीच्या प्रचाराला बळी न पडता डॉ. प्रितम मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी वकील संघाला केलं.

पंकजा मुंडे यांनी आज वकील संघाच्या कार्यालयात वकिलांशी संवाद साधला. प्रारंभीच मी भाषण नाही तर संभाषण करायला आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्या म्हणाल्या, मी कुणालाही न दुखावता राजकारण करते. मुंडे साहेबांनी आयुष्यात कधी जात पाहिली नाही आणि आम्ही बहिणींनी कधी जात पाहिली नाही. मात्र विकासावर बोलण्यासाठी राष्ट्रवादीकडे बोलण्यासारखं काही नसल्याने त्यांनी पातळी सोडून प्रचार सुरू केलाय. मात्र आता जातीपेक्षा देशहित महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही सामान्य माणसाची इच्छा आहे, आपणही देशहितासाठी आशीर्वाद द्यावेत, असं त्या म्हणाल्या.

जिल्ह्यातील विकासकामांबाबतही पंकजांनी माहिती दिली. परळी – बीड – नगर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. रेल्वे मार्ग झाला की उद्योग वाढतील. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचं जाळं तयार झालंय. त्यामुळे विकासाला गती आली आहे. आगामी काळात कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला मिळविण्यासाठी आणि गोदावरीचे पाणी सिंधफणा नदीत आणण्यासाठी नियोजन चालू आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही बहिणी कमी पडणार नाहीत, कारण मी चमचेगिरी करून पुढे आलेले, नाही असं सांगून स्वाभिमानी जनता आपल्या लेकीला ऐतिहासिक मताधिक्य देऊन विजयी करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लेक म्हणून आपण प्रितम मुंडे यांच्या पाठीशी आपले मतदानरुपी आशीर्वाद कायम ठेवा, असंही त्या म्हणाल्या.

बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडून एकमेकांमध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपकडून बीडसाठी विद्यमान खासदार प्रितम मुंडे या उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. बीडसह बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या जागांसाठी 18 तारखेला मतदान होणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.