Ajit Pawar : भाजप नेत्यांची नाव घेत शिंदेंना तोंडावर अजित पवारांनी सांगितलं, मी भेदभाव करणारा नाही, बंडखोरांचा निधीचा कांगावा खोडला

मतदार संघात विकास कामे करण्यासाठी आमदारांना निधी ठरवून दिलेला असतो. 2019 पर्यंत आमदरांना केवळ 1 कोटींचा निधी होता. यामध्ये वाढ करुन 2 कोटी करण्यात आला. आता तो 5 कोटीवर आहे. तो काही एकट्या राष्ट्रवादीच्या आमदारांना होता असे नाही. सर्वांसाठीच हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे जिथे विकास कामाचा विषय असेल तिथे आपण कधीच मतभेद केले नसल्याचे अजित पवार यांनी पटवून दिले आहे.

Ajit Pawar : भाजप नेत्यांची नाव घेत शिंदेंना तोंडावर अजित पवारांनी सांगितलं, मी भेदभाव करणारा नाही, बंडखोरांचा निधीचा कांगावा खोडला
अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 1:23 PM

मुंबई : (MVA) महाविकास आघाडीबरोबर अनैसर्गिक युती झाली शिवाय राष्ट्रवादीकडून निधीवाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप (Rebel MLA) बंडखोर आमदारांनी केला होता. एवढेच नाहीतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला बाजूला सारुन कोणताही निर्णय घ्या असे म्हणत जे झाले त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस जबाबदार असल्याचे दाखविण्यात आले होते. पण विधानसभेत बहुमताची चाचणी होताच (Ajit Pawar) आ. अजित पवार यांनी निधीबाबत करण्यात आलेले आरोप खोडून काढले आहेत. निधीत मतभेद होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण विकास कामाबाबत आपण कधीच दुजाभाव करीत नसल्याचे पटवून देताना अजित पवार यांनी (Eknath Shinde) शिंदेंना भाजपातील चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरिश महाजन, आशिष शेलार यांचा हवाला दिला. एवढेच नाहीतर बंडखोर आमदारांना दिलेल्या निधीचाही त्यांनी लेखाजोखा देत निधीबाबतचा कांगावा खोडून काढला आहे.

अजित पवारांनी वाचला निधी वितरणाचा पाढा

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीसाठी केवळ राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खरी स्थिती काय आणि निधीवाटपात दुजाभाव झाला नसल्याचे सांगत अजित पवार यांनी वाटप केलेला निधी सभागृहातच वाचून दाखविला. 2019 मध्ये नगविकास खात्याला 3 हजार 61 कोटी, 2020-21 मध्ये 2 हजार 177 कोटी, 2021-22 ला 4 हजार 52 कोटी रुपये दिले होते तर आता 2 हजार 645 कोटी दिले गेले होते. एवढे सर्व असताना 1 हजार कोटी रुपये देण्याचेही ठरले होते. त्यामुळे भेदभावचा विषयच येत नाही. एकनाथ शिंदे यांना 366 रुपयांचा निधी, संदिपान घुमरे यांना 137 कोटी, उदय सामंत 261 कोटी, दादाजी भुसे 306 कोटी, गुलाबराव पाटील 309 कोटी, शंभुराजे देसाई 294 कोटी, अब्दल सत्तार 206 कोटी, शहाजी पाटील 151 कोटी अशापध्दतीने निधी वाटप होत असताना कुठे आला भेदभाव असा सवाल त्यांनी उपस्थित केला

आमदार निधी कोट्याचीही दिली आठवण करुन

मतदार संघात विकास कामे करण्यासाठी आमदारांना निधी ठरवून दिलेला असतो. 2019 पर्यंत आमदरांना केवळ 1 कोटींचा निधी होता. यामध्ये वाढ करुन 2 कोटी करण्यात आला. आता तो 5 कोटीवर आहे. तो काही एकट्या राष्ट्रवादीच्या आमदारांना होता असे नाही. सर्वांसाठीच हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे जिथे विकास कामाचा विषय असेल तिथे आपण कधीच मतभेद केले नसल्याचे अजित पवार यांनी पटवून दिले आहे. रोखठोक स्वभाव आणि स्पष्टोक्ते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. त्याच पध्दतीने बंडखोरांनी केलेले आरोप त्यांनी खोडून काढले आहेत.

हे सुद्धा वाचा

शेवटी सर्वकाही मुख्यमंत्र्यांच्या हातामध्येच

निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करणे हे चुकीचे आहे. यामागे वेगळाच स्वार्थ होता. शिवाय निधी वाटपात जर भेदभाव होत असता तर सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. त्यांच्या सहमतीनेच ही प्रक्रिया होते असे म्हणत अजित पवार यांनी बंडखोर आमदारांकडून जे आरोप केले जात होते ते खोडून काढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला होता तो चुकीचा असल्याचेही ते म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.